शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! एकमत


दे धक्का...!
एकमत

परस्परांना विरोध करणारे नेते
फायद्यासाठी एकमताने तयार होतात,
कोणतीही घासाघीस न करता
स्वतःचे पगार,भत्ते वाढवुन घेतात !

मंत्री, राज्यमंत्री व आमदारांचे
वेतन सचिवांच्या बरोबरीने होणार,
अधिवेशनाचं फलित होवो न होवो
सातवा वेतन आयोग लागू होणार !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24902/new/#new

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! घातपात


दे धक्का...!
घातपात

दुर्घटनेची कारणे आता
सर्वांकडून शोधली जातील,
आरोप प्रत्यारोप करून
चौकश्यांचे फार्स केले जातील!

एकदा विचारा त्या नदीला
का असा तीने अपघात केला?
तीही सांगेल, उपसुन वाळू
तुम्हीच माझ्याशी घातपात केला!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24896/new/#new

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! उत्तर राहून गेले


दे धक्का...!
उत्तर राहून गेले

वाहणारे पुरात वाहून गेले
कुटुंबियांचे अश्रु विरून गेले,
डंका पिटणारे कार्यक्षमतेचा
सुरक्षित गोंधळ करून गेले !

बांधलेल्या पुलाचा हिशोब
शतकानंतर गोरे सांगुन गेले,
द्यायचा दोष कोणास येथे ?
विचारून चारही खांब गेले !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24878/new/#new

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

वाटा...


वाटा

अश्वस्त किती काळ रहावे?
बांधली जरी शिल्पे तटावरी
फिरते घेउन वादळास येथे
लाट येण्या ती किनार्‍यावरी !

अखंडतेचा ध्यास धरावा
कुठवर आता ह्या पावलांनी,
उरतात जखमा येथल्या
वाळूवर मग कणा कणांनी !

हेलकावे मनाचे हे जणू
वाहतात या सागर लाटा,
उमटविल्या जरी कितीही
मिटतात वाळूवरील वाटा !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t24872/new/#new

दे धक्का...! निष्काळजीचा फटका


दे धक्का...!
निष्काळजीचा फटका

निष्काळजी पणाचा फटका
ब्रिटीशकालीन पुलाने दिला,
आगावु सुचना मिळून सुध्दा
पुल वाहतुकीस होता खुला!

बेपत्ता झालेली माणसं, वाहनं
कधी, कशी शोधली जाणार?
घडलेल्या दुर्घटनेची अंतरीम
जबाबदारी आता कोण घेणार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24870/new/#new

सांज चारा


!! श्रावण !!

!! श्रावण !!

शब्द सरी बरसल्या, मन चिंबचिंब झाले,
श्रावण महतीने मन कसे श्रावणमय झाले !

प्रथम, श्रावण स्वागता व्रत नागपंचमी आले,
जाणिवेने सण व्रतांच्या मन उल्हासित झाले !

व्दीतीय, नारळी पौर्णिमा श्रीफळ रत्नाकरा अर्पिले,
टिकविण्या नाते जन्माचे रक्षाबंधना भाऊराय आले !

तृतीय, मंगळागौर सणाला नव्यानवरींनी अंगण सजले,
झिम्मा फुगडया खेळांनी जागरण खेळता रंगले !

चतुर्थ, गोकुळी अष्टमीला सावळे श्रीकृष्ण जन्मले,
नंतर बाळगोपाळ एकत्र दहिहंडी साठी खेळले !

पंचम, अमावस्या पुन्हा बैलपोळा नावाने म्हटले,
कष्टतात जे वर्षभर सारे कृतज्ञतेने त्यांना पुजिले !

© शिवाजी सांगळे 🎭

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! लोकल/टेल्गो


दे धक्का...!
लोकल/टेल्गो

एक नवं क्रांती पर्व
आता सुरू होणार आहे,
सर्वाधिक वेगवान "टेल्गो"
भारतीय रेल्वेत आली आहे!

वेगवान "टेल्गो"चं स्वागत
आपण मना पासुन करायचं,
एक विनंती रेल्वे प्रशासनाला
ठेवायच भान लोकल समस्यांच!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24849/new/#new

सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

असा किनारा


दे धक्का...! श्रध्दा कि संपत्ती?


दे धक्का...!
श्रध्दा कि संपत्ती?

शिर्डी विश्वस्तमंडळा साठी
राजकारण्यांची नसतांना मर्जी,
काही पुढार्‍यांनी लागलीच
जाहिर केली आपली नाराजी !

बाबावरची श्रध्दा म्हणायची?का
नजर भरणार्‍या त्या झोळीवर?
प्रत्येकाला मात्र कायम वाटतं
पडावं तुप आपल्याच पोळीवर !

© शिवाजी सांगळे🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24826/new/#new