बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! नको त्यांना फाशी


दे धक्का...!
नको त्यांना फाशी

अज्ञानी चुकला तर हसु येते
ज्ञानी चुकला तर काय होते?
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकीने
नविन वादाला तोंड फुटते !

केंद्रीय शिक्षण मंत्रीच जर
नको त्यांना देवु लागले फाशी?
असल्या शैक्षणिक वातावरणात
पिढी येणारी शिकेल कशी?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25140/new/#new

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! लाखांची गोष्ट


दे धक्का...!
लाखांची गोष्ट

तीन लाखांवरचे व्यवहार
या पुढे आता बंद होणार?
देशाचं भलं होवो न होवो
काहींची मात्र गोची होणार!

काळ्या पैशावर या, काबू
ठेवायला याची मदत होईल,
सर्व पक्षीय राजकारण्यांची
मदत देशास उन्नतीकडे नेईल!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25127/new/#new

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

मला वाटते... आँलिम्पिक निमित्त

मला वाटते...
आँलिम्पिक निमित्त

पी व्ही सिंधु व साक्षी मलिक यांनी त्याच्या क्रिडा प्रकारात अव्वल खेळ करून देशाचं व स्वतःचं नाव मोठं केलयं या साठी त्या दोघींचं व त्याच्या प्रशिक्षकांच मनःपर्वक अभिनंदन.

आज त्यांच्यावर अनेक राज्यांतुन नानाविध बक्षिसांची घोषणा आता होउ लागली आहे, हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे, त्या दोघींनी आज जगभरात भारताचे नाव मोठे केलंय, त्याच कौतुक निश्चितच व्हायला पाहीजे व ते होत आहे.

दुसरा एक विचार करता असं वाटतं कि आज जी बक्षिसं त्यांना दिली जात आहेत, तीच रक्कम जर यापुर्वी त्यांच्या चांगल्या प्रशिक्षणावर, सुविधांवर खर्च केली गेली असती तर? आज जे यश त्यांनी मिळवलं आहे त्या पेक्षा अजुन मोठं, उत्तुंग यश त्या मिळवू शकल्या असत्या, तसेच त्याच्या सारख्या अन्य खेळाडूना प्रशिक्षण घेण्यासाठी सुविधा झाली असती व आणखी नवे खेळाडू निर्माण झाले असते.

प्रत्येक राज्याने केवळ स्पर्धे उपरांत बक्षिसांची घोषणा करण्या ऐवजी होतकरू व मेहनती खेळाडूंना दत्तक घेवुन त्यांना उच्च प्रतिचं प्रशिक्षण पुरवुन जागतिक स्तरावर चमकण्याची संधी द्यायला हवी, योग्य क्रिडा धोरण अवलंबुन त्यात कोणाताही हस्तक्षेप न होउ देता सकारात्मक पणे राबवायला हवे, मग पहा किती पदकं आपल्या देशाला मिळतात ते.

मी एक सामान्य क्रिडा प्रेमी आहे कुणी क्रिडा तज्ञ वा जाणकार नाही, तेंव्हा सहज  मनात विचार आला कि जर अमेरिका, चीन, ब्रिटन व अन्य पदक तालिकेतील उच्च स्थानावर असलेल्या देशातील राज्यांनी अशाप्रकारे बक्षिसे दिली तर काय होईल? मलां वाटलं त्या त्या राज्यांना इतरांकडून कर्ज घेवुन बक्षिसं द्यावी लागतील इतके विजेते खेळाडू आहेत त्याच्या कडे आहेत.

भारतिय खेळाडू खुप प्रतिभावंत आहेत, फक्त योग्य सकारात्मक पोषक क्रिडा धोरण ठरवलं व त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली कि मग पहा पुढच्या स्पर्धे वेळी आपली पदक संख्या वाढते कि नाही.

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25116/new/#new

दे धक्का...! जात कंची?


दे धक्का...!
जात कंची?

खेळाडूंनी घाम गाळला
पदकांचीही कमाई केली,
इकडे मात्र खेळा सोडून
खेळाडूंची जात सर्चली !

एकविसाव्या शतका मध्ये
खेळामधे राजकारण करतो,
प्रोत्साहन वगळता, आम्ही
जात धर्म शोधण्यात रमतो!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25109/new/#new

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! कृती प्रतिनीधी


दे धक्का...!
कृती प्रतिनीधी

अधिकारी, कर्मचारी चुकलाच
तर त्यांना जाब विचारला जातो,
लोकप्रतिनीधीही मग काही वेळा
बेधडक त्यांच्यावर हात उचलतो!

चुकलाच जरी लोकप्रतिनीधी
त्यांना कुणी का जाब विचारतो?
अधिकारी, कर्मचार्‍यांची बिशाद
त्यांच्यावर कधी हात उचलतो?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25092/new/#new

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! "राज" कारण


दे धक्का...!
"राज" कारण

फिरून फिरून आम्ही
तीथंच पुन्हा परत येत असतो,
खाउन झालं किती तरी
शिळ्या कढीस उत आणत असतो !

"राज" कारण म्हटलं तर
सोयी नुसार विषय घेत असतो,
दर दोन पाच वर्षां नंतरच
महाराष्ट्रासाठी उर भरून येत असतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-''-25068/new/#new

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! श्रीमंतीचे परीक्षण


दे धक्का...!
श्रीमंतीचे परीक्षण

पापक्षालना साठी, माणुस
नेहमी जातो देवाच्या दारी,
देवास काय ठावूक, माणुस
तीथेही करीत असतो चोरी !

आपोआप गायब होते सोने
पद्मनाभ मंदिरातून कोटींचे,
काढावेच सरकारने शोधुन
गुंतलेले हात ज्या कोणाचे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25060/new/#new

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! बंधन


दे धक्का...!
बंधन

बंधनात अडकतात नाती
राजकारणात का टिकती?
आधी शिवबंधन होते,आता
अटलबंधनाची हो चलती !

समयानुसार होताना बंधने
तयास म्हणतात वाटे युती?
वाटा नसता सत्तेत, कधी
होते भाषा, तोडण्याची युती!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25037/new/#new

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! सत्तरीतलं स्वतंत्र्य?


दे धक्का...!
सत्तरीतलं स्वतंत्र्य?

गौरव करता करता इतिहासाचा
भविष्याचा विचार कधी करणार?

आधुनिक युगात आम्ही जगतांना
अंधाअनुकरण किती करणार?

दलित व महिलांवरचे अत्याचार
सत्तराव्या वर्षी असेच का राहणार?    

असंख्य सारे प्रश्न अनुत्तरीत असे
पिच्छा आमुचा कधी सोडणार?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25025/new/#new

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! तिरंगा


दे धक्का...!
तिरंगा
भारत माझा देश महान
आम्हा त्याचा अभिमान,
पाहतो त्या बनवु आम्ही
जगती एक मोठी शान !

मान आमुचा असे तिरंगा
फडकावू आम्ही डौलाने,
स्वातंत्र्य दिना उपरांत, त्या
आम्हीच सांभाळू मानाने !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24996/new/#new