बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

टूर टु ग्वालियर...एक प्रवास

टूर टु ग्वालियर...एक प्रवास

!! गणपती बप्पा मोरया !!

     तीस वर्षात प्रथमच गणपती उत्सवात काहि विशेष निमित्ताने ग्वालियर (म.प्र.) येथे सासुरवाडीला येण्याचा योग आला, ज्या कामासाठी आलो ते काम सुखकर्ता दु:ख हर्ता गणपती बाप्पा सुखरूप पार पाडील अशी आशा करतो. 

     ग्वालियर, (म.प्र.) येथे खास करून सर्वच मराठी कुटुंबात पुणेरी विशेषत: पेशवे परंपरेचा पगडा जाणवतो, तस तर या शहराला एैतिहासिक संदर्भ व परंपरा आहेतच. लहान लहान रस्ते, गल्ल्या असलेल्या शहरात प्रत्येक नाक्यावर, गल्लीच्या कोपर्‍यांवर शक्तीदेवता हनुमानाची मंदिरेे जागोजगी दिसतात, या व्यतिरिक्त इतर अन्य देव देवतांची सुध्दा खुप मंदिरे आहेत, त्यामुळे इथे सतत उत्सवाचे वातावरण असते. 

     इथल्या मराठी लोकांमध्ये सण उत्सव साजरे करण्यात व विशेष करून खाद्द संस्कृतीत पुणेरी प्रभाव जास्त जाणवतो. ऐतिहासिक वारसा असलेलं शहर असल्यामुळे आजही येथे जुन्या परंपराची जपणुक केली जात आहे, पिढी बदलानुसार आधुनिकते कडे झुकत चाललेलं शहर अशी ओळख होवु लागली आहे. नविन नविन गृह प्रकल्प येवु लागल्या मुळे शहरात आता मल्टीस्टोरेज ईमारतींचे निर्माण होत असल्यामुळे एक नवेच वेगळे रूप शहर घेवु लागले आहे. इथे प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते, या सोबत अचलेश्वर नामक प्रसिध्द विभागात एका पुरातन स्वयंभु शिवमंदिरा समोर गेल्या पन्नास एक वर्षाची परंपरा असलेल्या गणेश मंडळाकडून सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याची परंपरा या शहरात सुरू केली असे चौकशीत समजले. 

    गणपती उत्सवानंतर इथे दुर्गा उत्सव व दिवाळी फार जोरदार साजरी केली जाते, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या अठरापगड सामजाच्या अनेकविध परंपरेनुसार साजरे केले जाणारे बरेच सण, उत्सव वर्षभर सुरू असतात. बाकि व्यापारी वर्ग फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फार मोठी उलाढाल येथे चालते. इतर शहरांप्रमाणे इथे सुध्दा शहराचा विस्तार होउ लागलाय, जुने व नवे असे दोन भाग स्पष्ट दिसतात. एकंदरीत एकदातरी भेट देण्याजोगे शहर आहे, आजुबाजुला फारच सुंदर ऐतिहासिक परंपराची अन्य शहरे आहेत जसे शिवपुरी, मथुरा, आग्रा, खजुराहो वगैरे. बर्‍याच वर्षां पासुन या शहराबद्ल काहितरी लिहावं असं मनात होतं तो योग आता आला एवढंच.

      खरं तर इथे आलो होतो ते काही वेगळ्याच कामासाठी, परंतु ते कार्य परमेश्वर कृपेने व्यवस्थित पार पडले. या प्रकारे प्रवास 
वर्णनात्मक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, कही चुकलं असेल तर सर्व वाचक सहकारी सांभाळुन घेतील हि अपेक्षा.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25418/new/#new

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1091497450904906&id=100001339833771

दे धक्का...! काळाचे बाबा

दे धक्का...!
काळाचे बाबा

कित्येक काळा पासुन हे बाबा
नेहमी प्रचारात सांगत असतात,
परदेशी मालास टक्कर देत
स्वदेशीचा जम बसवु पाहतात !

योगा सह उपभोगाची साधने
बाबा आता निर्माण करू लागले,
खान्यापिण्याच्या वस्तुं सोबत
हल्ली कपडे सुध्दा शिवू लागले !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25403/new/#new

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! टँक्स पेट्या

दे धक्का...!
टँक्स पेट्या

इन्कम टँक्स चुकवायला
लोक वेगवेगळे मार्ग शोधतात,
तेच लोक देवाच्या पेटीत
डाँलर व दागिने गुपचुप सोडतात!

यापुढे इन्कम टँक्स ऐवजी
सरकारने धार्मिक टँक्स घ्यावा,
टँक्स रिटर्न फाँर्म ऐवजी
दरवर्षी दानपेटयांचा कँप्म लावावा !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25402/new/#new

सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! कार्यकर्ते

दे धक्का...!    
कार्यकर्ते

राजा पेक्षा आजकाल
कार्यकर्ते आहेत जोमात,
दरवर्षी दादागीरी आता
होउ लागली मंडपात!

भाविकांची सारी भक्ती
रांगेतच पेंगाळु लागते,
वशिल्यांच्या भक्तांसाठी
आपसातच जुंपुन जाते!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25387/new/#new

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

दे धक्का...! दारू बंदी

दे धक्का...!
दारू बंदी

वैध काय अवैध काय?
दारू ती दारूच हाय,
काहीही समजुन प्यायली
तरी, नशा तर देणारच हाय !

बंदी साठी तीच्या आता
नवे पर्याय शोधणार काय?
कशाला उगा फार्स करता?
कारखानेच बंद होत का नाय?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25365/new/#new

दे धक्का...! स्वच्छतेचं सर्वेक्षण

दे धक्का...!
स्वच्छतेचं सर्वेक्षण

स्वच्छतेच्या क्षेत्रात पण आता
महाराष्ट्राने आपला नंबर राखला,
क्यू.सी.आय. च्या सर्वेक्षणात *
सिंधुदुर्गाने पहिला नंबर घेतला!

स्वच्छतेचा फायदा, हा तसा
सर्वांनाच कायम होत असतो,
त्याचेच अभियान राबवले, तर
त्यात अनेकांचा सहभाग हाेतो!

*(क्वालिटी कौन्सिल आँफ इंडिया)

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25357/new/#new

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

रीत

रीत

ओथंबुन बरसायची कधी
मेघ बरसल्या सारखी,
असते भरून आता
मळभ दाटल्या सारखी!

बरेच दिवस वाट पाहतोय,
काही खबर नाही तीची...

         असच काहीसं झालं कि मनात बरेच विचार दंगा करू लागतात, थोडं शांत होताच, मन उगीच कालच्या व आजच्यात तुलना करायला लागतं....

          पुर्वी तश्या सुविधा फार कमी होत्या, तेंव्हा एकमेकास पत्रं पाठवली जायची, अगदिच महत्वाचं वा काही गंभीर बाब असलीच तर ट्रंककाँल करावा लागत असे, नंतर नंबर टेलीफोनचा, तरी कारणापरत्वे कधी तरी फोन करायला मिळायचा, हातातून सुटत नसे फोन बर्‍याचदा तेंव्हा, पण हल्ली चित्र पार पालटलयं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असुन सुध्दा शब्द कमी पडू लागलेत, वेळ म्हटला तर तो तसाच आहे, बारा अधीक बारा तासांची विभागणी केलेला, फक्त आपल्या जाणिवांचेच काटे जास्त फिरू लागलेत असं वाटतं!

          किती सोप व सरळ होतं ना सारं तेंव्हा! बर्‍याच घटना, गोष्टी त्यांचा तात्कालीक उच्चतम व न्युनतम परिणाम होउन गेल्यानंतर कळत असत, तरीही त्यांचे विविध पडसाद तेवढयाच तिव्रतेने उमटत असंत व त्या बद्लच्या प्रतिक्रिया पण तशाच पोहचत असत, किंबहुना त्यावरील प्रतिक्रियांची पलिकडच्या बाजुला प्रतीक्षा होत असायची. आज तर सारंच इंन्स्टट झालयं, टेक्नाँलाँजी मुळे सेकंदात अनेक गोष्टी एकिकडू दुसरीकडे त्यांच्या परिणामां सकट पोहचतात, तरीही त्यातील ओलावा हरवल्यासारखा वाटतो, एक कृत्रीमता जाणवते, कदाचित टेक्नाँलाँजी मुळे प्राप्त झालेल्या एका माहितीवर आपलं मत पक्क होई पर्यंत वेगळ्याच विषयाची दुसरी माहिती प्राप्त होते, दरम्यान अगोदरची माहिती थोडी दुर्लक्षित होते व तीचा प्रभाव पडायचा राहून जातो. माहितीचा ओघ येवढा तीव्र व प्रचंड आहे कि पाच मिनिटा पुर्वी काय पाहिलं वा वाचलं हे सुध्दा लक्षात रहात नाही, आणि तशीच सवय आपण आपल्या मेंदुला पण लावतोय कि काय? असं मला वाटतं.

          पुर्वी घोकंपट्टी करावी लागे, एक एका गोष्टींची कित्तेक पारायणे घडत, मनावर कोरल्या जात त्या गोष्टी, घटना ते प्रसंग लक्षात रहात, माहितीचा ओघ कमी होता म्हणुन कि काय त्याच त्याच गोष्टी चघळल्या जायच्या? पण एक कबुल करायलाच हवं ते म्हणजे घोकंपट्टीमुळे बर्‍याच बाबतीत पाया पक्का होउन जायचा.

          विचार करता टेक्नाँलाँजीचा फायदा तसा खुप होतोय, पण माणुस दुरावतोय, तेच ते छापील मेसेज कट पेस्ट करून पाठवले जातात किंवा घाईगडबडी बोलणं होतं, त्याला पत्राची वा बुथवरच्या काळ्या पिवळ्या फोनवरून उच्चारलेल्या शब्दांची सर नाही येत, एक तकलादूपणा येवु लागलाय, भावनांचा मोहोर नसलेला. मेघदूताची रोमँन्टीक परंपरा असलेल्या आम्हाला सर्व सुविधा असुन कोरडेपणा का जाणवतो? कदाचीत जगण्याची रीतचं बदलत चालली आहे वाटतं आपली...!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25347/new/#new

दे धक्का...! यंदाही समुद्रात

दे धक्का...!
यंदाही समुद्रात

विसर्जनाची तयारी सारी
झालीच असेल ना सर्वांची?
पाण्यात उतरतांना फक्त
काळजी घ्या एकमेकांची !

स्टिंग रे आणि जेली फिश
आलेत यंदाही समुद्रात,
निष्कळजी पणे उतरू नका
उघड्या अंगाने पाण्यात !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-25356/new/#new

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

मला वाटते.... रीत

रीत

ओथंबुन बरसायची कधी
मेघ बरसल्या सारखी,
असते भरून आता
मळभ दाटल्या सारखी!

बरेच दिवस वाट पाहतोय,
काही खबर नाही तीची...

असच काहीसं झालं कि मनात बरेच विचार दंगा करू लागतात, थोडं शांत होताच, मन उगीच कालच्या व आजच्यात तुलना करायला लागतं....

पुर्वी तश्या सुविधा फार कमी होत्या, तेंव्हा एकमेकास पत्रं पाठवली जायची, अगदिच महत्वाचं वा काही गंभीर बाब असलीच तर ट्रंककाँल करावा लागत असे, नंतर नंबर टेलीफोनचा, तरी कारणापरत्वे कधी तरी फोन करायला मिळायचा, हातातून सुटत नसे फोन बर्‍याचदा तेंव्हा, पण हल्ली चित्र पार पालटलयं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असुन सुध्दा शब्द कमी पडू लागलेत, वेळ म्हटला तर तो तसाच आहे, बारा अधीक बारा तासांची विभागणी केलेला, फक्त आपल्या जाणिवांचेच काटे जास्त फिरू लागलेत असं वाटतं!

किती सोप व सरळ होतं ना सारं तेंव्हा! बर्‍याच घटना, गोष्टी त्यांचा तात्कालीक उच्चतम व न्युनतम परिणाम होउन गेल्यानंतर कळत असत, तरीही त्यांचे विविध पडसाद तेवढयाच तिव्रतेने उमटत असंत व त्या बद्लच्या प्रतिक्रिया पण तशाच पोहचत असत, किंबहुना त्यावरील प्रतिक्रियांची पलिकडच्या बाजुला प्रतीक्षा होत असायची. आज तर सारंच इंन्स्टट झालयं, टेक्नाँलाँजी मुळे सेकंदात अनेक गोष्टी एकिकडू दुसरीकडे त्यांच्या परिणामां सकट पोहचतात, तरीही त्यातील ओलावा हरवल्यासारखा वाटतो, एक कृत्रीमता जाणवते, कदाचित टेक्नाँलाँजी मुळे प्राप्त झालेल्या एका माहितीवर आपलं मत पक्क होई पर्यंत वेगळ्याच विषयाची दुसरी माहिती प्राप्त होते, दरम्यान अगोदरची माहिती थोडी दुर्लक्षित होते व तीचा प्रभाव पडायचा राहून जातो. माहितीचा ओघ येवढा तीव्र व प्रचंड आहे कि पाच मिनिटा पुर्वी काय पाहिलं वा वाचलं हे सुध्दा लक्षात रहात नाही, आणि तशीच सवय आपण आपल्या मेंदुला पण लावतोय कि काय? असं मला वाटतं.

पुर्वी घोकंपट्टी करावी लागे, एक एका गोष्टींची कित्तेक पारायणे घडत, मनावर कोरल्या जात त्या गोष्टी, घटना ते प्रसंग लक्षात रहात, माहितीचा ओघ कमी होता म्हणुन कि काय त्याच त्याच गोष्टी चघळल्या जायच्या? पण एक कबुल करायलाच हवं ते म्हणजे घोकंपट्टीमुळे बर्‍याच बाबतीत पाया पक्का होउन जायचा.

विचार करता टेक्नाँलाँजीचा फायदा तसा खुप होतोय, पण माणुस दुरावतोय, तेच ते छापील मेसेज कट पेस्ट करून पाठवले जातात किंवा घाईगडबडी बोलणं होतं, त्याला पत्राची वा बुथवरच्या काळ्या पिवळ्या फोनवरून उच्चारलेल्या शब्दांची सर नाही येत, एक तकलादूपणा येवु लागलाय, भावनांचा मोहोर नसलेला. मेघदूताची रोमँन्टीक परंपरा असलेल्या आम्हाला सर्व सुविधा असुन कोरडेपणा का जाणवतो? कदाचीत जगण्याची रीतचं बदलत चालली आहे वाटतं आपली...!
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25347/new/#new

दे धक्का...! आत्मपरीक्षण?

दे धक्का...!
आत्मपरीक्षण?

हल्लीच पोलिसांच्या मागे
लोक हातधुवुन का लागले?
परीस्थितीचा विचार करा
कुणाचे, कुठे, काय चुकले?

दोहोंना आता आत्मपरीक्षण
करण्याची नक्की गरज आहे,
दोघांतील राजकिय हस्तक्षेप
खरचं टाळण्याची गरज आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25346/new/#new