गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

शोध... स्वतःतल्या "स्व" चा

शोध...
स्वतःतल्या "स्व" चा

पसारा गोंधळल्या मनाचा
कसा सावरावा, कसा आवरावा ?
उडणार्‍या पाखराचे पंख
जेव्हा आपलेच वाटू लागतात
मग उडू लागतं, भरारी घेऊन मन,
स्वच्छंद... मोकळ्या पोकळीत...
कधी समाधी अवस्थेत,
तर कधी बधिर स्थितीत...!
कोणती अवस्था खरी...?
भानावर येते घंटेच्या स्वराने
कि तल्लीन होते कधी...पेटीच्या सुरांनी?
अगणित कोड्यांच्या, कोषात,
जोड्यांत गुंफलेलं, फुल पाखरू
सोडू पाहतं कोषाला कधी?
तरी गुंतत राहतं, एकसुरी... अल्पजीवी...
कृष्णविवरात या, "स्व" दिसत नाही,
कधी स्वतःतला, ऐकू येत नाही...
आवाज आतला...
कळूनही गीतेचा अर्थ,
गुरफटत राहतो व्यर्थ !
ऐकून सुध्दा...
ज्ञानोबाची, तुकोबाची, एखादी ओवी...!
कणा कणांनी बनलेल्या
गोळ्याला जोजवलं जातं
अलवारपणे रूजवलं जातं
कालांतराने शरीर मोकळेे होतं...
मन पुन्हा उंचउडू पाहतं,
आभाळाला गवसणी घालायला,
हरवलेल्या "स्व" शोधायला,
अविरत चक्रात फिरायला,
चौर्‍याऐंशी कोटी, कुणी म्हणे दोन?
कोणास ठाऊक? खरं खोटं...
हाच प्रश्न फिरत ठेवतो मनाला,
अनंत काळ शोधायला...
काळ शोधायला...अनंत...अनंत

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/''-25781/new/#new

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

बंदि

बंदि

दिवाळीत फटाक्यांवर, बंदि घाला,
रानात यंदा पाखरांनी, फैसला केला!

=शिव

पण काहीही म्हणा... सवलत


पण काहीही म्हणा...
सवलत

मिळतात फायदे म्हणुन
घ्यायचे कोण सोडतो आहे?
परवडणारा सुध्दा रोज
सबसिडीतुन जेवतो आहे !

फुकट ते पौष्टीक असते
हाच सार्वत्रिक समज आहे,
परवडत असुन सुध्दा, सर्व
उगा सवलत घेणे गैर आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25773/new/#new

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... भारत देशा?


पण काहीही म्हणा...
भारत देशा?

आधी वाटला दोन देशात
पुढे विखुरला जाती धर्मात,
भोग असे का भारत देशा?
वाटला जातोय आरक्षणात?

सत्तरीच्या वयात सुद्धा, का
नसे समानतेची न्याय सत्ता?
पुरविता लाड ते विविधतेचे
बनावी कशी जगी महासत्ता?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25735/new/#new

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

ये उम्र बता जरा?

ये उम्र बता जरा?

बुने थे कुछ सपने
रेशम की डोरसे
फिसल गये हाथों से
रेत की तरहा...

वक्त चलता रहा
घडीके फेरों के साथ
तरसती रही उम्र
सुनी र्आँखों की तरहा...

क्या पता था आसमांको
जमीं और उसके बीच
थमेंगी कोहरेकी चादर
दरार की तरहा...

ये उम्र बता जरा?
कब तब चलेगा यह
सिलसिला धुंप छाँव का
दिन और रात की तरहा...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/hindi-kavita/t25723/new/#new

पण काहीही म्हणा... संबध दोष


पण काहीही म्हणा...
संबध दोष

विवाहबाह्य संबध म्हणे वाढले
फेसबुक आणि वाँट्स अँप मुळे,
ओळख नसलेल्या नात्यांमधे
कुणाशी कसे वागावे का न कळे?

माध्यमांना दोष द्यायचा, पुरती
सवयच बघा आम्हाला लागली,
चुकिच्या मार्गी स्वतः जाताना
स्वतःचीच लाज का न वाटली?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25715/new/#new

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... समाज मन


पण काहीही म्हणा...
समाज मन

बलात्कार करणारा तो, तर
मुकाट बलात्कार करून जातो,
रस्त्यां रस्त्यावर समाज मात्र
सार्वजनिक मालमत्ता पेटवून देतो !

अश्याने का बलात्कार्‍यांच्या
वृत्तीत कधी, काही बदल होतो?
बदलायचे म्हणता, समाज मन
त्यावेळी आम्ही शांत का बसतो ?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25693/new/#new

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

लोकल ट्रेन - जीवनवाहिनी



लोकल ट्रेन - जीवनवाहिनी

          मुंबई व तीच्या उपनगरातील लोकांची जीवनवाहिनी, अर्थात मुंबईची लोकल ट्रेन. अगदि छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ते खोपोली, सीएसटी ते पनवेल तसेच चर्चगेट ते डहाणु पर्यंत राहणार्‍या चाकरमान्यांची हि लाईफ लाईन.

          उद्या दसरा सर्वांना सुटी असल्या मुळे एक दिवस अगोदरच मुंबईचा लोकल प्रवासी या लाईफ लाईनचं कौतुक करतो, तीची पुजा करतो, एक प्रकारे तीच्या बद्लची कृतज्ञता व्यक्त करतो. वर्षभरात जरी कधी ती उशीरा धावली, रद् झाली तरी तेवढ्या वेळापुरता तीच्यावर रागवणारा, वेळ प्रसंगी शिव्या देणारा, तीची अडवणूक करणारा प्रवासी दसर्‍याच्या दिवशी सर्व विसरून तीला सजवतो, नारळ, हार व प्रसाद अर्पण करतो तसेच त्या वेळी ड्युटीवर असलेले मोटरमन व गार्ड यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करतो, प्रत्येकजण आपआपल्या कंपार्टमेंट मधे सजावट करून देवीप्रतिमेला गंध, पुष्प वगैरे अर्पुण आरती करतो नंतर प्रसाद दाखवुन अल्पोपहार व भेट वस्तुंचे वाटप करतो.  

          प्रवास संपता संपता पुढच्या वर्षी येणार्‍या दसर्‍याचे मनसुबे करीत आप आपल्या कामाला निघुन जातो. इतक्या दोन विरूद्ध टोकाचे स्वभाव दर्शन घडते मुंबईच्या लोकल प्रवाश्याचे. हि कहानी आहे मुंबईच्या धावत्या लोकलची व तीच्या प्रवाश्याची ...

          आम्ही पण आज सालाबाद प्रमाणे आमच्या सकाळच्या ८.११ बदलापूर ते सीएसटी लोकलची गाडीच्या अन्य प्रवाश्यासारखी पुजा केली व सर्व सह प्रवाश्यांसोबत अल्पोपहार करून आप आपल्या कामाच्या गंतव्य ठिकाणी उतरून मार्गस्थ झालो, पुढील दसर्‍याची वाट पाहण्या साठी.

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t25689/new/#new

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... जय हो, वाघ


पण काहीही म्हणा...
जय हो, वाघ

नामशेष होणार्‍या वन्यजीवात
आता वाघांचीही वर्णी लागली,
जय वाघाच्या गायब होण्याने
सर्वत्र त्यांची चर्चा होउ लागली!

सरकार दरबारी पाहीलचं तर
बरेच कागदी वाघ नाचवले गेले,
संवर्धनाच्या आरोळ्या देणार्‍या
अधिकार्‍यांचे मांजर कसे झाले?

© शिवाजी सांगळे 🎭http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25680/new/#new

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... रोप वे ची शक्कल


पण काहीही म्हणा...
रोप वे ची शक्कल

मेट्रो झाली नंतर मोनो झाली
एसी लोकलचीही चाचणी झाली,
गर्दी कमी करण्या साठी आता
रोप वे ची शक्कल कशी लढवली?

खरा प्रश्न गर्दीचा वेगळाच आहे
एकाच दिशेला सार्‍यांचा फ्लो आहे,
कार्यालयांचे विकेंद्रींकरण व्हावे
यावर हाच एकमेव तोडगा आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25653/new/#new