गुरुवार, ८ जून, २०१७

हायकू


छोटं पाखरू
चिवचीव ते गाणे
टिपते दाणे

नभ दाटले
या पावसाच्या धारा
चिंब पसारा

निळे आभाळ
भिरभीरे पाखरू
मना सावरू

सोमवार, ५ जून, २०१७

कोरा कॅनवास


शहाणे व्हा-सजग व्हा

शहाणे व्हा-सजग व्हा

वृक्षसंवर्धन आम्हा जमेंना
नुसत्या आम्ही गप्पा करतो,
रस्ते न् बिल्डींग साठी
पाहिजे तशी झाडे तोडतो !

ढगांना सुद्धा हवी आहे
पृथ्वी छान चांगली हिरवीगार,
पाहून तीचे रूप गोजीरे
बरसतात मनसोक्त धुंवाधार !

तोच जर गेला संपावर
आम्ही रागवायचे कोणावर,
पैसा सुध्दा होतो खोटा
कसं यायचं त्यानं धरणीवर !

शहाणे व्हा, सजग व्हा
पर्यावरणाची सारे धरा कास,
सोडा गप्पा अन् आळस
मिळेल सर्वांना जीवन खास !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t28740/new/#new

शनिवार, ३ जून, २०१७

पण काहीही म्हणा... मतभेद


पण काहीही म्हणा... मतभेद

आमच्या आमच्यात
होत नाही एकी,
नेते मात्र करतात
सारे फेका फेकी !

एक म्हणतोय
घेतला संप मागे,
दुसरा म्हणतो
आम्हा कोण सांगे?

आपल्याच पायात
आपला पाय हवा,
नेतृत्व करायला
एकच मान्यवर हवा !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t28736/new/#new

ताटे

ताटे

कोणास लाभ आहे सांडून दूध वाटे
कोणा उपास राहे फेकून शाक वाटे
----------
नाही मिळे अनाथा खाण्यास एक वेळी
सांगाव यांस कोणी वाढून द्या कि ताटे
----------
=शिव 01062017

गुरुवार, १ जून, २०१७

मला वाटते... मुलगी एक दुवा


मला वाटते... झाड व सोबती


मला वाटते... मोठे पण


मला वाटते... प्रणय चित्र...


बुधवार, ३१ मे, २०१७

चोरीला शिक्षा

चोरीला शिक्षा

एके दिवशी, झाले काय?
उंदराने ओढले, मांजरीचे पाय

मांजरी म्हणे, हे रे काय?
उंदिर सांगतो, गम्मत हाय

आपण दोघ, दुकानात जावु
आपल्या साठी, घ्यायला खाऊ

मांजरी म्हणाली, चल तर निघु
नाही ना कुणी, दुकानात बघु

दोघं शिरले, दुकानाच्या आत
चाॅकलेटवर मारला, चांगला हात

दोघंही बसले, चाॅकलेट खात
ईतक्यात आला, मालक आत

ओरडून घेतली, हातात काठी
दोघही पळाले, दरवाज्या पाठी

घाबरून बसले, दोघं लपून
मालकाने घेतलं, पोलिस बोलवून

पोलिसांनी त्यांना, नेलं पकडून
आणि ठेवलं, तुरूंगात डांबून

चोरी करणं, केव्हाही वाईट
शिक्षा मिळते, मग जबरी टाईट

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t28703/new/#new