मंगळवार, ४ जुलै, २०१७

देवा देवा

देवा देवा

नसे चित्त हे आता थार्‍यावरी देवा
फिरे देह माझा हा वार्‍यावरी देवा

तुझे भक्त रे आम्ही पायीच चालावे
दिमाखात ऊभा तू वीटेवरी देवा

कुणा तूप रोटी दूजाभाव तू केला
असे पोट कोणाचे हातावरी देवा

निती गैर झाली लोकांची पहा आता
तया चांगले घ्यावे फैलावरी देवा

दिला वापराया एका मोकळा वाडा
जगावे कसे मी या वाटेवरी देवा

पडू देत यंदा धोधो पाऊस येथे
पहा राबतो खासा शेतावरी देवा

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t28967/new/#new

रविवार, २ जुलै, २०१७

हायक

#हायक ९३
एकाकी झाड
पाहते चोहिकडे
मेघ सावळे ०२.०७.२०१७

#हायक ९२
आनंद दुखः
पापण्यांचा किनारे
अश्रु वाहती ०२.०७.२०१७

#हायकू ९१
पहाट वारा
हवा हवा झोंबरा
जीव कापरा ०२.०७.२०१७

शनिवार, १ जुलै, २०१७

हायकू

#हायकू ९०
बिंबांचे गुढ
अर्थात गुतवितो
हायकू खेळ ०१.०७.२०१७

#हायकू ८९
भिजली भुई
डवरला अंकुर
जन्मला जीव ०१.०७.२०१७

#हायकू ८८
वळण वाट
ल्याली हिरवा साज
कोकणातली ३०.०६.२०१७

हायकू

#हायकू ८७
सांज दाटली
परतीच्या सावल्या
घराची ओढ ३०.०६.२०१७


#हायकू ८६
भावना वेग
व्यक्त होण्या आतूर
भाव हायकू ३०.०६.२०१७

#हायकू ८५
सहज भाव
भावना ती अतीव
व्यक्त हायकू २९.०६.२०१७

गुरुवार, २९ जून, २०१७

स्वप्नांनाे

स्वप्नांनाे

मेघांवर स्वार होतो मी
पाऊस मिठीत घेतो मी

ऐकून दुख:, सुखाचे ते              
सोडून खुशाल देतो मी

थांबून रहाच स्वप्नांनाे
घेण्यास कवेत येतो मी

माझाच हट्ट कशा साठी
सोडून अहंम जातो मी

झालेत शब्द लिहूनी जे
बांधून सुरात गातो मी

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28926/new/#new

हायकू

#हायकू ८४
नभ दाटले
अंधारून ते आले
मन व्याकूळ २९.०६.२०१७

#हायकू ८३
रित आभाळ
वाहून गेले जळ
जरा उसंत २९.०६.२०१७

#हायकू ८२
उन पाऊस
उधळतात रंग
रत्न खड्यांचे २९.०६.२०१७

हायकू

#हायकू ८१
पाऊस वर्षा
हिरवीगार धरा
शृंगार नवा २८.०६.२०१७

#हायकू ८०
थोड्यात सांग
जरा कोड्यात सांग
एैक हायकू २७.०६.२०१७

#हायकू ७९
गुंजते शीळ
पाखराचा हाकारा
सावध प्राणी २७.०६.२०१७

बुधवार, २८ जून, २०१७

ऐक ना


मन माझे


जे रास्त आहे

जे रास्त आहे

हर एक येथला जरा जरा व्यस्त आहे
जगण्या पेक्षा मरण थोडे स्वस्त आहे

विचारता खुशाली तुम्ही ती कुणाला
सांगेल लगेच मी पण जरा त्रस्त आहे

करतो चौकिदार निवांत आराम येथे
घालतो मालक स्वरक्षणा गस्त आहे

पैसाच गरजेला पुरेना करून नोकरी
चोर सफेदपोश येथे मात्र मस्त आहे

करूनी आत्महत्या जातो बळी येथला
ऐकुन सुध्दा हाकारे यंत्रणा सुस्त आहे

उद्याचे आम्ही करतो तयार हमाल येथे
वाहण्या ओझे दप्तरांचे जे जास्त आहे

लिहिणे का हे गैर काही वाटते येथले?
वाटले म्हणुन सांगे शिव जे रास्त आहे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28920/new/#new