रांजणखळगे (Potholes) निघोज
१९९० च्या दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने जागतिक पातळीवर नोंद घेऊन मानाचा दर्जा देऊन गौरवलेले ठिकाण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील निघोज गावापासून केवळ दोन कि.मी. वर
कुकडी नदीवरील जगप्रसिध्द व आशिया तील सर्वात मोठे
पॉट होल्स अर्थात
रांजणखळगे पाहण्याचा योग शनिवार दि.१४ एप्रिल रोजी एका कार्यक्रमामुळे आला.
वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळ्या रूपातील सौदर्य पहावयास मिळणाऱ्या या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने नदि पात्रातील दगड या खडकांवर सतत घर्षण करीत फिरल्यामुळे अतिशय सुंदर असे रांजणाच्या आकारातले कोरीव खळगे निर्माण झालेले पहावयास मिळतात तसेच कितीही दुष्काळ पडला तरी येथील पाण्याची पातळी कमी होत नाही व हि परंपरा गेल्या कित्येक शतकापासून तशीच आहे असे स्थानिक सांगतात.
स्थानिक भाषेत या रांजणखळग्यांना "कुंडमाऊली" असे म्हणतात. निघोज गावामध्ये माता मळगंगा देवीचे सुंदर असे मंदिर आहे, तसेच या दोन्ही तीरांना जोडणारा एक झुलता पुल देखील असुन त्यावर चालतांना एका वेगवेगळ्याच अनुभवाचे आपण साक्षीदार होतो.
© शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९