शुक्रवार, ४ मे, २०१८

शिवकालीन घोडेबाव


 




कधीकाळी आपला महाराष्ट्र, इतिहास जपणारा, परंपरा पाळणारा होता असं म्हणावसं वाटतं आता, कारण बऱ्याच वर्षांनी परवा दिनांक १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या मध्यवर्ती भागात जुन्या शासकीय  विश्राम गृह व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात असलेला शिवकालीन ठेवा म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठा व्यास असलेली तसेच बारा महिने गोड्या पाण्याचा भरपूर पाणीसाठा व खास करून पाण्या पर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या असलेली #शिवकालीन_ऐतिहासिक_घोडेबाव_विहीर
पाहण्यासाठी गेलो, वाटलं होतं कि तीची अवस्था ठिकठाक असेल, परंतू विहीरीची दुरावस्था पाहिल्यावर पुरता भ्रमनिरास झाला. विहिरीत आता खूप मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडलेला आहे तसेच चौफेर झाडी वाढल्याने  विहिर भकास दिसते.

शेजारच्याच गोवा राज्यातील काही ऐतिहासिक स्थळं पाहिल्यावर मनात त्यांची नकळत तुलना होउ लागते, मात्र आपल्या कडील या व ईतर बहुतेक ऐतिहासिक स्थळांचा विचार करता खूप वाईट वाटतं. ऐतिहासिक वास्तूच्या दुरूस्तीकडे प्रशासना कडून होत असलेले दुर्लक्ष आणि उत्साही पर्यटकांकडून होणारे विद्रुपीकरण सुद्धा नाकारता येणार नाही.

प्रशासनाच्या संबंधित विभागाने व पर्यटकांनी गंभीरपणे विचार करून आपला ऐतिहासिक वारसा जपायला हवा व येणाऱ्या पिढीसाठी आपल्या थोर व आदर्श इतिहासाच्या खुणा जपाव्यात येवढीच माफक अपेक्षा.

© शिवाजी सांगळे
संपर्क:९५४५९७६५८९

शनिवार, २८ एप्रिल, २०१८

हायकू ३०९-३११

#हायकू ३११

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३१०
कशाची आस
वय वाढता ऱ्हास
मन उदास २७-०४-२०१८

#हायकू ३०९
पाकळीवर
दव विरघळले
नेत्री दाटले २६-०४-२०१८

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

हायकू ३०६-३०८

#हायकू ३०८
सांज विरते
कुशीत डोंगराच्या
छटा रंगाच्या २५-०४-२०१८

#हायकू ३०७
वार्धक्य शोधे
जगतो अधे मधे
माणूस प्राणी २३-०४-२०१८

#हायकू ३०६
सुसाट वारा
सळसळ पानांत 
कंप मनात
#शिव २१-०४-२०१८

चक्रव्यूह

चक्रव्यूह

सर्वच अभिमन्यु
येथल्या भारतातले,
कुणी सत्तेत गुंतला
कुणी मस्तीत गुंतला
कुणी हत्तेत चक्रव्यूहागुंतला
कुणी धर्मात गुंतला
कुणी भुकेत गुंतला
कुणी कर्जात गुंतला
कुणी शौकात गुंतला
कुणी बलात्कारात गुंतला
फरक एवढाच कि...
नाही सुटला...
ईथे आत्महत्येतून
आणि तो अभिमन्यु
त्या चक्रव्यूहातून
इथे मात्र बाकीचे
सहीसलामत सुटतात
कसल्याही चक्रातून...
कसल्याही चक्रातून...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30748/msg71146/#msg71146

बुधवार, २५ एप्रिल, २०१८

रंग



याचक



याचक

याचक: खुप भूक लागा है, कुछ देव ना खानेको...
वाटसरू: चायपाव, वडापाव काय देऊ?
याचक: कुच बी चलेगा...
(वाटसरू हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर देतो)
हॉटेल मँनेजर: क्या सुनताय उसकी? वो ऐसाहीच करता है, नहीं खाएगा वो..!
वाटसरू: नाही हो, पैसे देण्या पेक्षा बरं ना? खायला मागतोय तो!
हॉटेल मँनेजर: आपकी मर्जी... ग्यारा रूपया दो... "ऐ... एक चायपाव पार्सल... लाना.
वाटसरू चहा पाव घेऊन याचकाकडे जातो, प्रेमाने त्याच्या हातात चहापाव देत... 
...घे खाऊन, बाबा.
याचक चहापाव हाती घेतो, वाटसरू कडे भेदक नजरेने पहात... 
पागल है दुनिया... पागल...हा हा... 
हॉटेल कडे पहात पावाचे तुकडे करतो
तोंडाने अतर्क्य बडबड करीत असताना चहासकट पावाचे तुकडे इतस्ततः भिरकावून देतो... 

©शिव 11-04-2018

शोध



डोह