गुरुवार, १७ मे, २०१८

गावपण

४६५/१५०५२०१८

शोधतो कुणाला?

शोधतो कुणाला?

मनी भेद-भाव तु रे पाळतो कशाला 
नाही धन जवळी त्या टाळतो कशाला 

बाळगूनी अभिमान वृथा शुभकार्यात 
आमंत्रणा गरीबा गाळतो कशाला

धन दौलत नसे पुरेशी कधी कुणाला 
माणुसकी ये कामी सोडतो कशाला 

पाहून हित सुखाचे लेक द्यावी सुज्ञा 
भेद रंक रावाचा मोजतो कशाला 

शोधावे सुख कुटुंबाचे समाजाचे 
लोभ स्वतः पुरताच तु ठेवतो कशाला 

एकची आत्मा परमात्मा साऱ्यांमधे 
राऊळी, मठात रे शोधतो कशाला 

© श्री शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९ 
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t30809/new/#new

रविवार, १३ मे, २०१८

रूप



मदर्स डे

 मदर्स डे

रोजच्या प्रमाणे ती, आपल्या पेक्षा वयस्कर आणि आजारी म्हाताऱ्या, म्हातारींची काळजी घेत होती. तीला तेच जमत होतं, कदाचित सवय लागली होती.

गेट मधे गाडी थांबल्याचा आवाज झाला, तीनं डोळे बारीक करून पाहिलं, सजलेलं एक कुटुंब कुणा म्हातारीची चौकशी करीत होतं. तीनं, त्यांना 'ती'च्या खोलीजवळ सोडलं न् कामाला लागली.

काही वेळ 'त्या' म्हातारीच्या खोलीतून बोलण्या हसण्याचे आवाज येत होते. मुलगा, सुन, नात, नातू म्हातारीशी किती बोलू किती नको असं करीत, सोबत आणलेला गोडधोड खाऊ अपचन होणाऱ्या म्हातारीला भरवु पहात होते, आणि 'ती' सर्वजण जवळ असून शुन्यात पहात एकटी पहुडलेली... 

मुलाने व्यवस्थापकाची भेट घेऊन पुढील सहा महिन्याचा चेक दिला... आणि 'ती'च्या खोलीकडे पहात म्हणाला... "हँप्पी मदर्स डे"

©शिव 13-05-2018

पुरावे उन्हाचे

पुरावे उन्हाचे

कष्टाने त्या चाळले होते मला 
चिंतेने पण जाळले होते मला 

देउ कशाला मी पुरावे उन्हाचे 
सावलीनेच पोळले होते मला 

दु:खाशी तर आहे सदैव मैत्री
सुखांनी पुरते छळले होते मला

नाही यादीत रे मी चाहत्यांच्या 
आधीच सारे कळले होते मला 

होते मजवरी खरे प्रेम जयांचे 
त्यांनी सुद्धा टाळले होते मला 

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30801/new/#new

व्यवहार