गुरुवार, १७ मे, २०१८

शोधतो कुणाला?

शोधतो कुणाला?

मनी भेद-भाव तु रे पाळतो कशाला 
नाही धन जवळी त्या टाळतो कशाला 

बाळगूनी अभिमान वृथा शुभकार्यात 
आमंत्रणा गरीबा गाळतो कशाला

धन दौलत नसे पुरेशी कधी कुणाला 
माणुसकी ये कामी सोडतो कशाला 

पाहून हित सुखाचे लेक द्यावी सुज्ञा 
भेद रंक रावाचा मोजतो कशाला 

शोधावे सुख कुटुंबाचे समाजाचे 
लोभ स्वतः पुरताच तु ठेवतो कशाला 

एकची आत्मा परमात्मा साऱ्यांमधे 
राऊळी, मठात रे शोधतो कशाला 

© श्री शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९ 
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t30809/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा