मदर्स डे
रोजच्या प्रमाणे ती, आपल्या पेक्षा वयस्कर आणि आजारी म्हाताऱ्या, म्हातारींची काळजी घेत होती. तीला तेच जमत होतं, कदाचित सवय लागली होती.
गेट मधे गाडी थांबल्याचा आवाज झाला, तीनं डोळे बारीक करून पाहिलं, सजलेलं एक कुटुंब कुणा म्हातारीची चौकशी करीत होतं. तीनं, त्यांना 'ती'च्या खोलीजवळ सोडलं न् कामाला लागली.
काही वेळ 'त्या' म्हातारीच्या खोलीतून बोलण्या हसण्याचे आवाज येत होते. मुलगा, सुन, नात, नातू म्हातारीशी किती बोलू किती नको असं करीत, सोबत आणलेला गोडधोड खाऊ अपचन होणाऱ्या म्हातारीला भरवु पहात होते, आणि 'ती' सर्वजण जवळ असून शुन्यात पहात एकटी पहुडलेली...
मुलाने व्यवस्थापकाची भेट घेऊन पुढील सहा महिन्याचा चेक दिला... आणि 'ती'च्या खोलीकडे पहात म्हणाला... "हँप्पी मदर्स डे"
©शिव 13-05-2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा