मंगळवार, २५ मार्च, २०२५

पांथस्थ

पांथस्थ

खरा तर नशिबाचा खेळ सारा
वळणावर संपतो रस्ता बिचारा
पाहताना दूरवरून कधी कधी
साऱ्यांना भुलवितो, हा नजारा

दोष ना त्याचा, न् तुमचा काही 
भ्रम केवळ, मनाचा खेळ सारा
सारीच वाट ती त्याची बेतलेली
वळणे नागमोडी, प्रवास न्यारा

व्याप मनाचा, अन् ताप देहाला
अविरत चाले हा संसार पसारा
कोणा ठावे कोण कुठवर साथी
संथ पथी, शोधे पांथस्थ सहारा

https://marathikavita.co.in/index.php?topic=53341.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शनिवार, २२ मार्च, २०२५

भावनांच्या भरात

भावनांच्या भरात

काहीबाही घडतं भावनांच्या भरात
ठरवूनही कैकदा येत नाही ध्यानात

कित्येकदा असतात शुल्लक घटना
तरीही, विषय वाढून जातो खोलात

ठरवतात नेहमी पुन्हा नको व्हायला
नाही म्हणूनही, वाद वारंवार होतात

होतो गैरसमज न् अकारण नाराजी
उगाच मन कुढते, मनातल्या मनात

होवो न वेडेवाकडे भावनेच्या भरात
दिलजमाई होता हे दोघेही ठरवतात

https://marathikavita.co.in/index.php?topic=53222.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

कथा २१०३२०२५ yq ०९:५१:४२


कथा

माझी पहिली कविता..अर्थात
तिच्या साठीच होती

तिला काहीच माहीत नसताना
ती माझी राणी होती

बराचसा काळ स्वप्नांत जगलो
ती मात्र अनभिज्ञ होती

आता ती कुठे? मीच अनभिज्ञ
उरली सारी कथा हाती

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

सोमवार, १७ मार्च, २०२५

नव मार्ग

नव मार्ग

सुधरत नाही,चुकलेली वाट पुन्हा एकदा 
का चुकलो आपण?मनात एकच तगादा 

शोधता उत्तरे, काहीच हाती लागत नाही 
झरू लागती अंतरी, नवे प्रश्न काही बाही

एक मात्र होते, धडा नवीन मिळून जातो 
जगण्याचा अर्थ स्वतःलाच कळू लागतो

समृद्ध होते, शिदोरी विविध अनुभवांची
कळते ना किंमत, भोवतालच्या जगाची 

कसाही असो न्याय उफराटा या जगाचा 
हिंमत येते शोधण्यास नव मार्ग स्वतःचा

https://marathikavita.co.in/index.php?topic=53033.0

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

प्रत्येक दिवस

प्रत्येक दिवस

प्रत्येक दिवस सारखा नसतो...
मानलं तर एकाअर्थी खरं आहे,
चाकोरीबद्ध जीवन हे आपलं
नियमितपणे तर जगतोच आहे !

कधीतरी नवी घटना समोर येते
अन् अचानक थोडा बदल होतो,
टाळू शकत नसल्याने, आपण
आपसूकच त्यात अडकून जातो !

असंच आहे अनिश्चिततेचं काम
निश्चितपणे अविरत चालत असते,
प्रत्येक दिवस हा सारखा नसतो
म्हणून सत्य हे मान्य करावे लागते !

https://marathikavita.co.in/index.php?topic=53030.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शनिवार, १५ मार्च, २०२५

वसा १५०३२०२५ yq १२:५५:३०

वसा

आता हे शब्द मला लिहितात...
कधीकाळी मी यांना वेचत होतो
लिहायचो परखडपणे काहीबाही 
लोकांच्या डोळ्यात बोचत होतो

आता हे शब्द मला लिहितात...
येवढी त्यांना माझी सवय झाली
आपोआप उतरतात कागदावर
कुणास ठाऊक कशी गट्टी झाली

आता हे शब्द मला लिहितात...
वाटते, खेळ हा कधीच थाबू नये
भले होवो काहीही या जीवाचे
घेतलेला हा सृजन वसा सुटू नये

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

बुधवार, १२ मार्च, २०२५

अनामिक ओढ


अनामिक ओढ 

इतक्यात आमची भेट झाली, न् नजरेला नजर भिडली
अचानक ही सांज झाली न् पाखरे घरट्याकडे निघाली

सळसळती कुंतल बटा या वाऱ्याने,जणू उसळती लाटा
भिरभिरती नजर माझी अशी का स्पर्धेत त्यांच्या गुंतली

गारवा भोवतीचा, अंगभर शहारे असे काय देऊन जातो
विझवू नकोस दिप अंबराचा गाली तीच्या लाली आली

होत असता प्रथेनुसार, मिठी नभांची दूरवर क्षितिजाला
एक रांग समुद्र पक्षांची किनाऱ्याकडे संथ परतू लागली

खेळावे रंगात मावळतीच्या आणि सहवासात सखीच्या
वाळूला पण, ओलेत्या मऊशार, मखमली भूरळ पडली

करावे दुर्लक्ष म्हणता, या सांजेकडे न् तिच्या कडे सुध्दा
ओढ अनामिक कोणती? मला तीच्याकडे ओढू लागली

https://marathikavita.co.in/index.php?topic=52850.0

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

खेळ खेळता ११०३२०१५ yq ०७:०४:४८


खेळ खेळता

भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
नक्की आनंद होतो जिंकल्यावर

उगाच दोषारोप होत जातात
हमखास एखादी मँच हारल्यावर

तरीही सर्वसामान्य विसरतो
खेळ कळतो,खरोखर खेळल्यावर

होत असते खेळात हारजीत
कळते खिलाडूवृत्तीने खेळल्यावर

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

सोमवार, १० मार्च, २०२५

आतला आवाज १००३२०२५ ya १८:५२:५५

आतला आवाज

आतला आवाज...तर कळायला हवा
बंदिस्त भावनानां वाव मिळायला हवा

कुठवर ठेवायचे कोंडून, विचार आता
झुंडीने एकत्रित आवाज करायला हवा

एकजुटीच्या अस्तित्वाने बदलते दशा
खंबीरपणे एक आवाज उठायला हवा

गारद झाल्या कैक सत्ता,इतिहास येथे
चमत्कार एकीचा, तो दाखवायला हवा

त्रयस्थ होऊन, कधी तरी दूरस्थ राहून
मना,स्वतःचाच आवाज ऐकायला हवा

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

नव्याने

नव्याने
प्रत्येक जण म्हणतो आयुष्यावर बोलू काही 
भले बुरे आले वाट्याला इतरांना सागू काही 

सुखदु:खांचे कैक तरंग उठती जगताना येथे 
कठीण हलके पापुद्रे त्यातील उलगडू काही 

भेद किती, न् काय दडले आहे जीवनात या 
चल् दोस्ता, आपण दोघं मिळून शोधू काही 

रचतो जरी जो कुणी डाव अतर्क्य गूढ इथले 
उत्तर म्हणून दोघं त्यातील हाणून पाडू काही 

भ्रष्ट केली यांनी गज़ल इथली म्हणोत कोणी 
वेगळेपण नव्याने आपले त्यांना रे दावू काही 
https://marathikavita.co.in/index.php?topic=52737.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९