मंगळवार, ६ मे, २०२५

आम्ही मोबाईलच्या


एका गँजेट संगे एकरूप झालो,
आम्ही मोबाईलच्या नादी लागलो ॥धृ॥

फेसबुक इंन्स्टा एकीकडे सुरु,
ट्विटरवर देखील ध्यान ते धरु
वॉट्सअँप तर आम्ही कोळूनी प्यालो..१ 
आम्ही मोबाईलच्या....

भुक हो मोठी लाईक कमेंट्सची,
त्याच्या पुढे कसली चव जेवणाची
कामधंदे पण सारे टाळू की लागलो..२
आम्ही मोबाईलच्या....

आयफोन ज्या कडे श्रेष्ठ तो झाला,
मागास म्हणती तो की पँड वाला
उगा एकमेकां आम्ही तोलू लागलो..३ 
आम्ही मोबाईलच्या....

https://marathikavita.co.in/index.php?topic=55888.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ५ मे, २०२५

डरा सा दिल ०५०५२०२५ yq १५:२४:०५

डरा सा दिल 

आजकल डरा डरा सा दिल रहता है
किसीसे बहुत कुछ कहना चाहता है

किस कारण सुननेवाला अभी अभी
पता नहीं कैसी नाराजगी दिखाता है

एकही धागे के बंधन में हम रहते हुए
रूखा रूखासा वह बरताव करता है

सोचो,कभी उतरें हम जीद पर अपनी
ना कहना फिर, हमें भी बुरा लगता है

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ३ मे, २०२५

साखर झोप

साखर झोप

नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी
होतात खरी, पहाट स्वप्ने, साखर झोप ती हवीहवीशी

वाहता मोगरगंध, मंद त्या कुंतलांचा
भास होता जरासा नाजूक पैंजणांचा
वेडावून देते हालचाल तुझी ती जराशी
मीही शोधतो किणकिण हात उशाशी...१
नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी

चाळवते झोप न् अंगभर उठतो शहारा 
मिठीत बद्ध होण्या तनू दे तनूस दुजोरा
बहरून गारव्यात अन् बिलगता उराशी
चालतो संवाद फक्त स्पर्शाचा स्पर्शाशी...२
नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी

हव्याहव्याशा तृप्तीने होता गात्रे सुस्त
अस्तव्यस्त तरी ही यौवन सुडौल पुष्ट 
वाटता, बोलावे पुन्हा मौनाने मौनाशी
लटका नकार न् डोळ्यात दिसते खुशी...३
नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी
होतात खरी, पहाट स्वप्ने, साखर झोप ती हवीहवीशी

https://marathikavita.co.in/index.php?topic=55761.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १ मे, २०२५

भाबडेपणा ०१०५२०२५ yq १६:२५:१०

भाबडेपणा

नाही ठाऊक फुलपाखराला
डायरीमधील फुल सुकले आहे!

कोरडलेल्या पाकळ्यांना पण
भावशून्य शब्दांची साथ आहे!

तरीही भाबडेपणा वेडा इतका
फुलपाखरू घिरट्या घेत आहे!

कुठवर जगावे आशेवर इतके
रंगीत गोजिरा छळभास आहे!

यावी ना,कल्पना या जीवाला
मोहात फसणे असे व्यर्थ आहे!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

अदृश्य प्रश्न

अदृश्य प्रश्न

अदृश्य ती गोष्ट मौनातून बोलते 
अतिरेकातून अत्याचार घडविते,
द्वेष अन् चिथावणीवरुन उगाच 
सर्वसामान्य जनतेचा बळी घेते!

सर्वच गोष्टीचे राजकारण येथे
प्रत्येकजण शंकास्पद वागतो,
आज देशाच्या सद्य स्थितीचा
कोण प्रामाणिक विचार करतो?

अन्याय, अत्याचार हा असला 
अजून कुठवर सहन करणार? 
सुधाणाऱ्या देशगाड्यास इथले 
देशद्रोही कितपत साथ देणार?

https://marathikavita.co.in/index.php?topic=55038.0

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २० एप्रिल, २०२५

अवेळ


अवेळ

ही रात्र बोचते मला जीवघेणा खेळ आहे 
चंद्रमा न् मीही एकटा नक्की कुवेळ आहे 

तारका नाहीत नभी, ती पण दिसत नाही 
ठरवून असावी चुकवली त्यांनी वेळ आहे 

अपेक्षित भेटीस इथे प्रतिक्षेत दोघे आम्ही 
कुठे ठावूक नाही तुम्ही कसला मेळ आहे 

का? हा असा विरह, तुम्हा आम्हा दोघांना 
काय असली ही?आपल्यावर अवेळ आहे 

काय चाललंय? काहीच कळेना मला तरी 
प्रक्तनाने मांडला, कसा विचित्र खेळ आहे 

https://marathikavita.co.in/index.php?topic=54885.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १९ एप्रिल, २०२५

'मराठी' खरी गरज

'मराठी' खरी गरज

मराठी मुंबई अगोदर खाली झाली
होऊन फितूर, कैवारी शांत बसले,
आता तर मागोमाग भाषा निघाली
कैवाऱ्यांना ना सोयरसुतक कसले!

येऊ देत हिंदी, येऊ देत गुजराती
इंग्रजी बोडक्यावर बसलीच आहे,
आम्ही सर्वकाही, मुकाट भोगतो
सहन करणे आमच्या रक्तात आहे!

कुणीही येवो, इकडे कुणीही राहो
आम्ही पोळी शेकून घेतली आहे,
परक्यांनाच मराठी सक्तीची करा
त्यांनाच, महाराष्ट्राची गरज आहे!

https://marathikavita.co.in/index.php?topic=54782.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

किती वेळा


किती वेळा

खिडकी वरील पडदा
किती वेळा ओढून घ्यायचा? 
वारा एवढा खट्याळ
तो असा हट्ट नाही सोडायचा!

नेहमी पाहणे तीला
टाळत असतो मी पडद्याआडून,
पाहून ओढाताण ती
पडदा आपणहून  घेतो उघडून !

वारा आणि पडद्याची
काही तरी वेगळी चाल असावी! 
त्यांनाही वाटत असावं
आम्हा दोघांची नजरबंदी व्हावी!

यश मिळो त्यांना, उगा
हो-नाही असं संमिश्रपणे वाटतयं,
काहीच सुचेना हो राव!
ह्रदय उगाच कशाला धडधडतयं?

https://marathikavita.co.in/index.php?topic=54646.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
 

अज्ञात शक्ती



















अज्ञात शक्ती

उच्चारलास कधी शेवटचा शब्द स्मरतो का 
मुक,अबोल संवाद ध्यानी कोणा राहतो का

चालणार कुठवर, प्रित ही राखून मौन असे
राग रूसवा एवढा, मनात कोणी ठेवतो का

कटाक्ष स्पर्श आधी, नंतर संवाद घडला येथे 
वैश्विक संपर्क आधार हा सहजी तोडतो का

होतो आघात शब्दांनी,कबूल, तरीही प्रेमात
दिल्या घेतलेल्या शब्दांचे महत्व टाळतो का

शब्दच देती धीर,आधार हिम्मत आपल्याला
प्रसंगी तीच असते अज्ञात शक्ती जाणतो का 

https://marathikavita.co.in/index.php?topic=54645.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

मोहब्बत १६०४२०२५ yq १३:४७:२५


मोहब्बत
 

हम तुम्हारे हो गए हैं फिर मोहब्बत में सनम 
और यकीनन फिर आ गए शोहरत में सनम 

जानते हुए कि काबिल हैं हम एक-दूसरे को 
ला ही दिया तक़दीर ने हमें सोहबत में सनम 

होने दो कामयाब यह अजीब दास्तां ए इश्क 
बेशक हमेशा ही रखेंगे हम खैरियत में सनम 

एतबार करो हम पर, करो बेशुमार मोहब्बत
रखेंगे पलकों पे तुम्हें बड़ी हिफाजत में सनम

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९