गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

विठ्ठला विठ्ठला

विठ्ठला विठ्ठला

ओढ दर्शनाची लागली आम्हाला

विठ्ठला विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला ||धृ||


निजरुप भाबडे आमच्या मनात

आस तुज भेटीची दाटली उरात

भेटशील आम्हा कधी तु कृपाळा

झालाय जीव अवघा आतुरलेला

ओढ दर्शनाची लागली आम्हाला ||१||


विसरलो संसार असा प्रेम ओढा

चाले भक्ती तांडा पायी वाट वेडा

टाळ मृदंग, कपाळी अबीर टीळा

हाती पताका, गळी तुलसी माला

ओढ दर्शनाची लागली आम्हाला ||२||


ज्ञान भक्तीयोग देवाजी तुज ठायी

ठेऊ दे एकवार माथा तुझ्या पायी

व्हावे सार्थक येऊनी या जन्माला

लाभो मोक्ष माझ्या नश्वर जीवाला

ओढ दर्शनाची लागली आम्हाला ||३||

विठ्ठला विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला

https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t34075/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

आतुरता आगमनाची
















https://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t33920/msg75332/#msg75332

©शिवाजी सांगळे 🦋papillon

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

लोणचं २६०८२०२१ ०८:४८


कोरोना न् लग्न

कोरोना न् लग्न

आलाय कोरोना जाईना कोरोना
सगळ्यांना आडवा येतोय करोना...धृ

कोण म्हणं बघा लाट नवी येणार
कुणाकुणाला ती गुंडाळून नेणार
नको नकोसे प्रश्न मनाला पडणार
कुणालाबी यातलं काय समजना
अजूनही यावरती उपाय सापडंना
आलाय कोरोना जाईना कोरोना...१

पोरं परेशान आणखी पोरी परेशान
संगतीनं त्यांच्या आईबापबी हैराण
महामारी पुढं सऱ्यांची झुकली मान
एकमेकांना बघाया जायला जमना
लॉकडाऊन मुळं या लगीन होईना
आलाय कोरोना जाईना कोरोना...२

आंवदाच संसार थाटावा वाटतो
दोनाचे चार व्हावे विचार करतो
मुलगी बघायला जायचं म्हणतो
कसंकाय उरकावं काही कळंना
तुचरं देवा आम्हाला रस्ता दावना
आलाय कोरोना जाईना कोरोना...३

https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t33710/new/#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

हिरवं दान (अष्टाक्षरी)

हिरवं दान

रान हिरवं हिरवं, मनाचं हरते भान
माया हि सृष्टीची, कसं फेडू हे दान 

निळे आभाळ वरती, रानी हिरवी चादर
रंगीबेरंगी फुलांचा, त्याच्या वरती बहर

विविधता किती सारी, भोवती हिरवा रंग
पाचूच्या लकाकण्याने, मन होतसे हे दंग

गोड गाणी पाखरांची, ऐकू येती चोहिकडं
हळव्या मनी तयांच्या, आहे रानाचीच ओढ

उपकार मानु किती, माय धरणी गं तुझे
अगणित अपराध, सोसलेस सर्व माझे

शहाणपण आम्हासी, येउ देत आता तरी
जमुदे करणे माया, आता जरा तुजवरी 

https://marathikavita.co.in/preranadai-kavita/()-33567/new/#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९