शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

लग्न म्हणजे ?


लग्न म्हणजे ?

लग्न म्हणजे काय असते?
दोन जीवांची गरज असते !

स्वतःची जरी नसली तरी
घरच्यांची ती निवड असते !

मिरवायचे जरी नसले स्वतः
इतरांची तशी हौस असते !

पहावं करून लग्न एकदा
लग्ना नंतर वरात असते !

वरात तर चालते जोरात
वर्‍हाडी मंडळी भरात असते !

चुकवत सारया त्या नजरा
जोडी स्वतःत गुंग असते !

सांभाळत उभयता संसार धुंदी
जीवना गोडी वाढवायची असते !

नाहीतर नवरा आपल्या घरी
अन् बायको माहेरात असते !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t19117/msg56122/#msg56122

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा