गुरुवार, १२ जुलै, २०१८

ईस्ट-वेस्ट

ईस्ट-वेस्ट

घेतली सुट्टी कामावरूनी रेस्ट आहे
मेजवानीचा घरी भारीच फेस्ट आहे

नांदतो प्रेमभाव येथे समजून स्वर्ग हा
निर्मिलेले असे हे आमचे नेस्ट आहे

करावी लागते थोडीफार हेल्प तीला
देणे चिरून कांदा ही खरी टेस्ट आहे

नकोसे वाटावे काम असले रडविणारे
येणार डोळा पाणी हे पण बेस्ट आहे

जगावे म्हणतो कोणी जीवन आनंदाने
सारीच धडपड एरव्ही तशी वेस्ट आहे

विस्तारले शहर ऐवढे येथे आजकाल
कळेना ईस्ट कोणती दिशा वेस्ट आहे

ऐकला होता चिपळीनाद मी पुर्वी कधी
हाती बाबांच्या हल्ली डेंटल पेस्ट आहे

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31059/new/#new
10-07-2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा