रविवार, २२ मार्च, २०२०

होळी (लावणी)

होळी (लावणी)

अवचित राया तुम्ही हो आला
सण होळीचा गोड की झाला

मिळो लाडीक तुमचाच संग
होऊन जावू या दोघ बी दंग
द्या उडवून पिचकारीतला रंग

शोभते ऐटीत तुमची स्वारी
नशा चढेल अंगभर न्यारी 
करा खुशाल तुम्ही जोराजोरी
मजा येईल आपल्या खेळाला
अवचित राया...

सण रंगेल वर्षातला लाख 
सोडून रुसवा वागूया नेक
ऐकावं म्हणणं माझं एक

कुरडया,भजी बरीच तळली
मऊ पुरणाची पोळी केली 
संगं आमटी कटाची झाली
चाखा चढवाया रंग पंक्तीला
अवचित राया...
©शिवाजी सांगळे 🦋

 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t32377/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा