रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

प्रॉमिस-(गत वर्षाला) ३११२२०२२ YQ ०९:२८:४०





















प्रॉमिस-(गत वर्षाला) 

गेले वाटते काही द्यायचे राहून
येत नाही तरीही काही आठवून

संकल्प केले, विसरलो किती
जाताजाता तु, घे ना रे समजून

उगवेल दिवस एक उद्या नवा
येईल आशा न् आकांक्षा घेऊन

पुन्हा उजळणी, पुन्हा संकल्प
प्रॉमिस, नाही जाणार विसरून

३११२२०२२ YQ ०९:२८:४०
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

पाणीपुरी















पाणीपुरी

"मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे"
ठाव मजला आवडे तुज पाणीपुरी खाणे

जाता पुरी मुखात, मुखी दाह का व्हावा
मिटताच ओठ, आस्वाद खरा समजावा
व्यर्थ ठरते येथे दूसरे काही विचारणे...

हाती पुरी गोल ज्याच्या त्याने का थांबावे
ज्याने न चाखली कधी, त्या कसे उमजावे
फस्त करीत पुऱ्या, ते समाधिस्त होणे...

दिसता कधी समोरी तो रंगबिरंगी ठेला
लगेच सुटे मुखी पाणी न् येतसे तजेला
मनी एक विचार फक्त पाणीपुरी खाणे...

 https://marathikavita.co.in/index.php?topic=45228.msg86749#msg86749

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

घालमेल १४१२२०२३

घालमेल

प्रयत्न करुन बघ, एकदा मन वाचून बघ 
कळतील सुखदुःखे, घालमेल ऐकून बघ 

मन चंचल, पाण्यातील मासोळी जणू
तसं तुझं वागणं देखील
लगेच थांग लागत नाही,
अन् माझी घालमेल होते...

समजून घ्यावं, द्यावं परस्परांना
यासाठी तर बधनात बांधतात ना?

आधी कसं कळायचं तुला सारं, 
माझ्या डोळ्यात पाहिल्यावर?
मलाही कधी भासली नाही गरज डिटेल्स सांगण्याची...
तेव्हा प्रेम होतं! मग आता कुठे गेलं?

राग, रुसवे तर चालतातच प्रेमात
म्हणून तर वाढते रंगत जगण्यात...

हरकत नाही तरीही, अजूनही बदल घडवू
बघ, ऐकताना, वाचताना अश्रू नको अडवू

मला माहीत होतं, असंच काही होणार
लाडाने कुशीत येत, तु नक्की सॉरी म्हणणार..।

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

तैयार हूँ २११२२०२२ YQ १०:४२:४५


























तैयार हूँ

बस् एक ख़्वाब देख रहां हूँ ज़िन्दगी 
तुझे अपने साथ देख रहां हूँ ज़िन्दगी 

गुमनामी में बिता वक्त कुछ थोडासा 
अब तेरा इंतजार कर रहां हूँ ज़िन्दगी 

ऐसा मुहं फेर लिया, तुने लहरों जैसा 
मै, पानी में, तुझे देख रहां हूँ ज़िन्दगी 

रूठ जाना मुझसे, पर ख़फा न होना 
तेरे ही भरोसे, मै चल रहां हूँ ज़िन्दगी 

लेती है इम्तिहान कभी कभी, पता है 
चल एकबार तैयार हो रहां हूँ ज़िन्दगी 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

पुन्हा जगा १९१२२०२३ YQ ०७:२७:०७


























पुन्हा जगा

काळ बदलला,बदलली वेळ सारी
दृष्ट लागली हरवलेल्या लहानपणाला

झाला पाऊसही आजकाल लहरी
तंत्रज्ञानाने, निरागसतेचा घास घेतला

बदलत गेले हळूहळू, आयाम सारे
सुटले हातून काय नच कळे कुणाला

नावाडी ना वल्हे तिच्या सोबतीला
तरी नाव द्यायची अशी साथ पाण्याला

बालपणी सम्राट मी मज विश्वाचा
कैक होत्या नावा अशा मज दिमतीला

जगा रे, पुन्हा जुने ते बाल्य आपले
येता संधी करा आपलेसे बालपणाला

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

रंगरूप १८१२२०२३ YQ ०२:२५;४७

रंगरूप

रंगरूप कुणा कसे मिळावे
हे असे कधी का ठरवून व्हावे

जरी मज रंग शामल काळा
फरक ना माझ्या गंधात वेगळा

गर्वाभिमान का नको मजला
श्रीकृष्णा सम मज रंग लाभला

रूप आगळे हे मला लाभले
दृष्ट लागण्याचे भाग्य ते हरपले

भाळू नये कधीही वरील रंगा
कळता शब्दमर्म लोकांस सांगा

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

जमाखर्च

























जमाखर्च

प्रश्न संपता संपत नाही उत्तर काही मिळत नाही
चालतो अखंड प्रवासी मार्ग काही सापडत नाही

शोध अस्तित्वाचा, कधी स्वतःच्या घेण्यास गेलो
विश्व असून सारे भोवताली मीच कुठे उरत नाही

जमाखर्च जगल्या क्षणांचा मांडावा कुठवर कुणी 
ताळमेळ सुख दु:खांचा, का नेमका लागत नाही

ठेवते लक्ष पक्षीणी, जसे पिल्लांवरती ते दूरूनी
आम्हास का, बारकाईने तसे काही दिसत नाही  

लोभात आपल्याच काय सांगू गुंतलोय मी कसा
हावरट आतला माझ्या शिवाय दुसरे पहात नाही

https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t45215/msg86730/#msg86730

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

साथ साथ ०६१२२०२३ YQ २१:२५:१५



























साथ साथ 

ये कैसी बेमौसम बरसात
कर देती है खराब हालात

फिर भी एक होय कमाल
एकसाथ बढा देती जज्बात

चलतें है कई मन मर्जी से
लेकर अपने हाथों में हाथ

अलग तरीके अपने अपने
कोई स्कूटर पर साथ साथ

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

ये खामोशी


























ये खामोशी

ये खामोशी बहोत कुछ याद दिलाती है
कभी कभी, हमें आगोश में भर लेती है

सर्द हवाओं में, टिमटिमाते सितारों संग
फिरसे एकएक लम्हों को दोहरा देती है

अकेला मन पाकर अक्सर ये खामोशी
अतीत में ढकेलने का, प्रयास करती है

मानो या न मानों, राज़ कई गहरें तुम्हारे
खामोशी से अपने साथ लेकर चलती है

जैसी भी हो भविष्य कि राह बताने का
एक नेक काम, ये खामोशी से करती है

https://marathikavita.co.in/hindi-kavita/t45155/new/#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९