मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

पुन्हा जगा १९१२२०२३ YQ ०७:२७:०७


























पुन्हा जगा

काळ बदलला,बदलली वेळ सारी
दृष्ट लागली हरवलेल्या लहानपणाला

झाला पाऊसही आजकाल लहरी
तंत्रज्ञानाने, निरागसतेचा घास घेतला

बदलत गेले हळूहळू, आयाम सारे
सुटले हातून काय नच कळे कुणाला

नावाडी ना वल्हे तिच्या सोबतीला
तरी नाव द्यायची अशी साथ पाण्याला

बालपणी सम्राट मी मज विश्वाचा
कैक होत्या नावा अशा मज दिमतीला

जगा रे, पुन्हा जुने ते बाल्य आपले
येता संधी करा आपलेसे बालपणाला

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा