बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

घालमेल १४१२२०२३

घालमेल

प्रयत्न करुन बघ, एकदा मन वाचून बघ 
कळतील सुखदुःखे, घालमेल ऐकून बघ 

मन चंचल, पाण्यातील मासोळी जणू
तसं तुझं वागणं देखील
लगेच थांग लागत नाही,
अन् माझी घालमेल होते...

समजून घ्यावं, द्यावं परस्परांना
यासाठी तर बधनात बांधतात ना?

आधी कसं कळायचं तुला सारं, 
माझ्या डोळ्यात पाहिल्यावर?
मलाही कधी भासली नाही गरज डिटेल्स सांगण्याची...
तेव्हा प्रेम होतं! मग आता कुठे गेलं?

राग, रुसवे तर चालतातच प्रेमात
म्हणून तर वाढते रंगत जगण्यात...

हरकत नाही तरीही, अजूनही बदल घडवू
बघ, ऐकताना, वाचताना अश्रू नको अडवू

मला माहीत होतं, असंच काही होणार
लाडाने कुशीत येत, तु नक्की सॉरी म्हणणार..।

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा