हरवलेले क्षण
हरवलेले क्षण फिरून अनुभवावे म्हणतो
गूज सुखदुःखांचे पुन्हा आळवावे म्हणतो
आखीवरेखीव चौकोनात या जीव गुंतला
वाटते सानिध्यात सृष्टीच्या जगावे म्हणतो
कसली भुरळ पडते मनाला या क्षणोक्षणी
दगदगीस जीवनातल्या रे थोपवावे म्हणतो
सुखे आधुनिक अताशा, रोज रे भोगतांना
झोपडीत चंद्रमौळी, पुन्हा नीजावे म्हणतो
केवढी रे लालसा, तुला मानवा ऐहिकाची
त्यागण्याचे भान प्रसंगी सर्वां द्यावे म्हणतो
https://marathikavita.co.in/index.php?topic=45287.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा