मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४

एक सर ०३०८२०२४ yq ०३:४४:३०

























एक सर

एक सर पावसाची येऊन ती काय जाते
पागोळ्या पुन्हा रोमांचित होऊन जातात
छतावर पडणाऱ्या एकएका थेंबाथेबातून
जून्या आठवणींना उजाळा देऊन जातात

पाऊस हा असा कित्येकदा पडत असतो
म्हणून का प्रत्येक वेळी हवासा असतो?
मनासकट सर्व आठवणींना स्वतः सोबत
नकोसा वाटत असता सोबत वाहून नेतो

डोळ्यासमोर कधी प्रलय येतो भावनांचा
अन नकळत त्याचाही जोर कोसळण्याचा
मग सुरू होते स्पर्धा, थेंब आधी की अश्रू?
विरहातला अनुभव कामी येतो वाहण्याचा

एकवेळ येते, पाऊस थकतो न् डोळे सुद्धा
संथ होऊन सर, अचानकच वारा सुरु होतो
मन स्तब्ध शांत, न् छप्पर ओघळत असतं
आश्वासक हात हलकेच खांद्यावर थबकतो

उबदार हाताच्या स्पर्शाने भानावर येतांना
नजर झुकते, थेंबामधे स्वतःला शोधू लागते
शोध संपत नाही आणि मन आवरत नाही
झटकन कवेत शिरता सर पुन्हा झरु लागते 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा