खंत आहे रे आजची,
तो ओलावा हरवलाय नात्यातला,
जो तो गुंतलाय आज
तांत्रिक जगात
जग जवळ आलयं,
माणसं दूर गेली...
प्रेम, माया, आपुलकी
कुठेेतरी हरवत चालली
माणुस शिकला!
खरंच का रे
सुसंस्कृत झाला?
नक्की आपण कुठे आहोत?
न् कुठे चाललोत?
शोधतो तकलादू आश्रय,
पैसे फेकून आनंद घेतो,
वडील धार्यांना
वृध्दाश्रमात ठेवुन...
स्वतःचा त्रिकोण
किंवा चौकोन
गोंजारत बसतो...
शेवटी
एक एक कोन
निखळतोच...
तो पर्यंत
उशिर झालेला असतो...
आपण?
एकाकी पडण्याच्या भितीने
जीवंतपणीच
मृत्यु यातना भोगतो...