बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

हायकू १४२-१४४

#हायकू १४४
ओढ ढगांची
धरतीही तृषार्त
पाणी नेत्रात १५-०८-२०१७

#हायकू १४३
शांत पवन
निरभ्र आसमंत
मनी उधाण १४-०८-२०१७

#हायकू १४२
तळे अथांग
वाऱ्याची झुळझुळ
उठे तरंग १३-०८-२०१७

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

हायकू १३०-१३२

#हायकू १३२

आनंद ठेवा
श्रावण मास आला
खेड्या पाड्यात ०३-०८-२०१७

#हायकू १३१
जळात छबी
भास आभास खेळ
प्रतिबिंब ते ०२-०८-२०१७

#हायकू १३०
श्यामल काळे
भावनांचे उमाळे
मेघ दाटले ०२-०८-२०१७

नको जीवना रे


नको जीवना रे

पहातोय सारा  तुझा डाव आता
कशा दावतो रे फुका भाव आता

पुरे आज  येथे  हि  खैरात सारी
उगा वाटतो ती तु मोकार आता

करा  माफ सारी  उधारी बळींची
तयारीत घेण्या गळा फास आता

सुरुवात माझी  जगायास झाली
नको जीवना रे  भिती दावु आता

धरावा सखे गं  कशाला अबोला
सुटे काळजाचा  इथे  धीर आता

कुणी  गोंदलेला  ठसा पावलाचा
कसे ते कळावे किनाऱ्यास आता

जळानेच माशा  असे  चिंब केले
भिजावेच त्याने  असे कर्म आता

नशा का चढावी  न  घेता जराही
तपासून आलो जरा स्टाँक आता

© शिवाजी सांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29220/new/#new

सोमवार, ३१ जुलै, २०१७

हायकू १२७-१२९

#हायकू १२९
मनाचा तळ
शून्यात फिरणारा
न दिसणारा ३१-०७-२०१७

#हायकू १२८
रात्र काळोखी
छता थेंबाचा मारा
संतत धारा ३१-०७-२०१७

#हायकू १२७