गुरुवार, २६ जुलै, २०१८

बुधवार, २५ जुलै, २०१८

दाखले

दाखले

एक है म्हणता बरेच हात सरसावले
बघता बघता रस्त्यावर टायर पेटले

कशाला हवेत शत्रू कुणी शेजारचे?
स्वकीयांनीच फुटूनी भगदाड पाडले

कुणी घोटती लाळ स्वार्थी सत्तेसाठी
देशद्रोही असता त्या म्हणोनी आपले

करीत राहिलो कित्येक वल्गना खोट्या
ठसविता चुकीच्याच पावलांवर पावले

वाटू पाहतोय सत्तरीत देश आम्ही
पुरवीत नसत्या जात धर्माचे चोचले

तु रे स्वातंत्र्या सावर आता आम्हाला
इतिहासच मागेल दाखल्यावर दाखले

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31101/new/#new

हायकू ३४८-३५०

#हायकू ३५०
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू ३४९
भक्त वाटेस
धरलेला वेठीस
देव राऊळी २३-०७-२०१८

#हायकू ३४८
खट्याळ वारा
कळ्यांना झुलवतो
काट्यां खुपतो १८-०७-२०१८

शुक्रवार, २० जुलै, २०१८

धरा


२२१/२६०३२०१८

खेळ


२२०/२५०३२०१८

वसंत


२१९/२४०३२०१८

वारसा


२४५/१६०७२०१८

व्हावं कधी


http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31086/new/#new