रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

क्षण भेटीचा



क्षण भेटीचा

आठवलं जेव्हा तुझं रूसणं 
लिहू म्हटलं पावसाचं गाणं 

कागद पेन घेताच जो पुढ्यात 
झालं मन का आपोआप सुन्न 

तरीही म्हटलं लिहू थोडफार 
हरवलं तेव्हाही तुझ्यातच मन 

किती दिलंय सुख या पावसाने 
चिंब आठवांचे ओलसर भान 

सर कोसळताच जोरदार एक 
स्मरला हळूच भेटीचा तो क्षण

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t31218/new/#new

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

तुला



५००/२५०८२०१८ 

पिक


पुरलेल्या त्या पैशाला
पिक लागावं खोऱ्यानं,
उपसतानां भरलं खळं
अंगही भिजावं घामानं !
४९९/२२०८२०१८

बगल

बगल

उचकी लागली आणि जाग आली
पाहिलं न् तु अॉन लाईन दिसली ! 

झोपलेला होता नवरा तोवर  
सासुची तेवढ्यात झोप उडाली !

काय राव झाली भलतीच गोची 
बायकोचीपण इथ झोप उघडली !

न आलेलं नळाला पाणी, आणि
उकळत्या दूधावर चर्चा झाली !

विषय काय घ्यावा हो रम्य प्रहरी
म्हणता, चर्चेला त्या बगलच दिली !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t31214/new/#new

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

हायकू ३६०-३६२

#हायकू ३६२
होते परीक्षा
दवाखान्यात आता
रांगेत शिक्षा २३-०८-२०१८

#हायकू ३६१
ओलेती कळी
दव थेंब दिसला
घरंगळला १७-०८-२०१८

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

मदिरा आख्यान

मदिरा आख्यान

पाहूनीया बाटली ! सुटे ना मुखा पाणी !
परलोक तो प्राणी ! पक्का जाणावा !!

जया अखंड ध्यास ! पिण्याचीच ती आस !
ऐसा भला माणूस ! विरळा जाणा !!

पितो मना पासून ! पाजतो आग्रहाने !
कधी उसनवारीने ! दोस्तांत प्रिय !!

लुटूनी घरा दारा ! गुत्याला जगवितो !
सकलां विसरतो ! व्यसनी खरा !!

खंगुनीया तो जाता ! पिऊन मदिरा हाला !
म्हणे कामातून गेला ! एक दारूडा !!

वाईटच हे व्यसन ! जावू नये त्या वाटे !
जाताची कर्म फुटे ! वदतो शिवा !!

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t31191/new/#new

भेट


४९८/२१०८२०१८ 

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

हायकु_०९


Image courtesy:google search


सृष्टी आनंद

सृष्टी आनंद

बांधले ओढ्याने, काल चाळ पायाला 
छुमछुम खळखळ, स्वर गमे कानाला 

दूर कड्यावर, सावळमेघ डोंगर माथी
गिरीशिखरा त्या, चुंबाया दौडत आला

तप्त धरा तृप्तली, अशी अमृत थेंबानी
गंधाळली मृदाही, चराचरी वेग भरला

अतृप्त एक तरू, तृषार्त कैक मासाचा 
लेण्या हिरवाई, मुक्तपणे चिंब नाहला

आनंदली झाडे, वेली, पशु, पक्षी सारे
नाद वाऱ्याचा, पावरीसम घुमु लागला

दान नभाचे घेता, सकलां आनंद देता
जाहला आनंद, सृष्टीस आनंद जाहला 

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31184/new/#new