बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

मदिरा आख्यान

मदिरा आख्यान

पाहूनीया बाटली ! सुटे ना मुखा पाणी !
परलोक तो प्राणी ! पक्का जाणावा !!

जया अखंड ध्यास ! पिण्याचीच ती आस !
ऐसा भला माणूस ! विरळा जाणा !!

पितो मना पासून ! पाजतो आग्रहाने !
कधी उसनवारीने ! दोस्तांत प्रिय !!

लुटूनी घरा दारा ! गुत्याला जगवितो !
सकलां विसरतो ! व्यसनी खरा !!

खंगुनीया तो जाता ! पिऊन मदिरा हाला !
म्हणे कामातून गेला ! एक दारूडा !!

वाईटच हे व्यसन ! जावू नये त्या वाटे !
जाताची कर्म फुटे ! वदतो शिवा !!

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t31191/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा