मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

वास्तविक ०८०२२०२५ yq १३:१४:४५


वास्तविक

गुलाबानेचं प्रेम व्यक्त होतं का?
प्रेमात ठिक, लग्ना नंतर जमतं का?

कोथिंबीर, मेथीची गरज असते
गुलाबा वाचून खरं काही अडतं का?

नक्कीच, रंगत वाढते संसारात
गुलाब, मोगरा किंवा गजरा दिल्याने,

वास्तविक वाढते गोडी खरोखर
परस्परांवर मनापासून प्रेम केल्याने!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५

चंद्रभास ३१०१२०२५ yq ०८:३६:३५


चंद्रभास

कळत नाही...काय करावं 
भासातलं जीवन कसं जगावं!

पाहता वास्तव हे भोवतीचे
मृगजळामागे कुठवर पळावं?

कळेना फरक वास्तवातला
खरंखोट सगळं कसं उमजावं?

धरु पाहता हाती तारामंडल
चंद्र आभासाने, किती छळावं?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

कालचक्र

कालचक्र

आयुष्य जगायचे राहिले...
मन म्हणते काय पाहिले..?

कळलेच नाही आजवर..
स्वतःस मी किती शोधले?

असेच प्रश्न कित्येक सारे
आजवर कधी ना पडले.!

थोडी उदासी, एक बैचेनी
तरीही जगणे नाही सुटले!

का अन् कसे कोण जाणे
कालचक्र अखंड चालले?

https://marathikavita.co.in/index.php?topic=50687.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २५ जानेवारी, २०२५

खऱ्या अर्थाने २५०१२०२५ yq ०२:३६:०५

खऱ्या अर्थाने

नातं स्वीकारता आलं पाहिजे...खऱ्या अर्थाने 
स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे..खऱ्या अर्थाने 

बोलले जरी कुणी कधी काहीबाही वेळेपरत्वे 
खरेखोटे पचवता आलं पाहिजे खऱ्या अर्थाने 

ठोकताळे जरी वेगवेगळे आपले...जगण्याचे 
स्पर्धेत या जगता आलं पाहिजे खऱ्या अर्थाने 

हार जीत दोन बाजू जरी, एकाच जगण्याच्या
अपयश रोखता आलं पाहिजे...खऱ्या अर्थाने

भासता कवाडे बंद, यशाची कुठेही स्पर्धेवेळी
द्वार रे ठोठावता आलं पाहिजे..खऱ्या अर्थाने

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

आठव पक्षी

आठव पक्षी

फिरुन अताशा हि आठवण कशाला
चुकला हिशोब साराच सांगू कुणाला

बराच काळ झाला गाठ नाही पडली
होईल भेट पुन्हा, आस होती मनाला

करून खोडी फांदीवर, एका पानाची
आठवणीत एक पक्षी हळूवार उडाला

स्तब्ध शांत असता परिसर भोवतीला
जळावरी हळव्या, तरंग का शहारला

होता शिडकावा पावसाचा तो जरासा
कळला ना अश्रू डोळ्यातला कुणाला

https://marathikavita.co.in/index.php?topic=50365.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

खेळ मनाचा


खेळ मनाचा

घेऊन दु:खाचे गाठोडे...कुठवर ते चालावे 
येताच संधी सुखाची...त्या तथास्तु म्हणावे 

सुख दु:ख मानने, न मानने खेळ रे मनाचा 
जाणून सत्य असत्य मना निर्णय त्वा घ्यावे 

वावर छद्मी रावणांचा भोवती वाढला आहे
मोह कशाचा करावा, मना विचारून पहावे

जो तो करतोय पुढे हात रंगीत प्रलोभनांचे 
रंगायचे कोणत्या रंगात, त्यात रे रंगून जावे 

आभासाच्याच, सर्व छटा इथल्या रंगांमध्ये 
स्थायी अस्थायी, समजून रे व्यवहार करावे 
https://marathikavita.co.in/index.php?topic=50187.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

केव्हातरी

केव्हातरी

स्वप्नातून वास्तविकतेकडे जायला हवं 
प्रसंगी, स्वतःचं परिक्षण करायला हवं 

गोड वाटतात ही स्वप्ने अचेतन मनाला 
भान वास्तवतेचं चेतनेत ठेवायला हवं 

असेल वळण सोपे, असे का समजावे
अंदाज घेत घेत वाटेवर चालायला हवं 

कुठवर ठेवशील भरवसा आभाळावर
छत डोक्यावर तेवढं सांभाळायला हवं 

चल, जाऊदेत साऱ्या बाता गैरवाजवी
केव्हातरी तु मनासारखं जगायला हवं
https://marathikavita.co.in/index.php?topic=50172.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १५ जानेवारी, २०२५

सुक्ष्म किती

सुक्ष्म किती

कधी कधी सावरावं लागतं...स्वतःला 
चुकतं कुठे विचारावं लागतं..स्वतःला 

कधीकाळी नसतानाही अपराध काही 
खापर दोषाचं सोसावं लागतं स्वतःला 

काय सुरू आहे जगरहाटी आजकाल 
दुरूनच रे लक्ष ठेवावं लागतं स्वतःला 

चालतोय खेळ सारा विलक्षण भोवती 
डावात येथील टिकावं लागतं स्वतःला

पसाऱ्यात विश्वाच्या या भल्या थोरल्या 
सुक्ष्म किती मी, पहावं लागतं स्वतःला

https://marathikavita.co.in/index.php?topic=50070.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

मकरसंक्रांत १४०१२०२५ yq १३:२३:०८

मकरसंक्रांत

जोडी तिळ अन् गोड गुळाची
वाढवते नित्य संक्रांत सणाची

स्निग्ध, स्नेह घेऊनी सोबतीला
वाढवते हेमंतात शक्ती तनाची

होताना उधळण ऋतूत थंडीची   
साथ तुझी हवी मला आनंदाची

सावरते जशी नभी दोर पतंगा
असावी सोबत तशीच दोघांची

आस आहे इतुकी मनात आता
वाढो गोडी मकरसंक्रांत पर्वाची

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ११ जानेवारी, २०२५

मनापासून

मनापासून

का असं वाटतं, की मागे काहीतरी राहिलं...?
आयुष्याबरोबरचं देणं घेणं अर्धवट राहिलं...?

जे काही तो देत गेला, मी खुशीने स्विकारलं  
भांडलो जेव्हा केव्हा त्याने मुद्दाम नाकारलं...!

कल्पना मला की, हट्ट हा तु सोडणार नाही
खेळवलं किती मला,सारं मी स्वतः भोगलं...!

होवू दे, माझं आता, जे काही होणार आहे 
तोंड द्यायचं त्यास मीही मनापासून ठरवलं...!

वेदना, शल्य माझे बोचरे हवं ते, त्या नाव दे
साचलेलं,मनातलं ते मी मोकळ्यानं मांडलं...!
https://marathikavita.co.in/index.php?topic=49902.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९