शनिवार, २४ मे, २०२५

व्यथा आजची

व्यथा आजची

काय काय सांगू? किती रे सांगू?
वाटते उगाच घेतली आज
मोठीच गडबड झाली आज !

कशाला नादी लागलो मी
फुकट मित्रांसोबत गेलो मी
त्या ब्रँडची, त्या व्हीस्कीची
पहिल्यांदा चव घेतली आज
मोठीच गडबड झाली आज !

तसा बुजरा, झालो धीट
पित राहिलो निट वर निट
शिकलो सवरलो असून मी
तरीही बेकार हिंडतोय आज
मोठीच गडबड झाली आज !

मुद्दाम बोलतो पिऊन मी
व्यथा आजची मांडतोय मी
नोकरी वाचून कसे जगावे
आहे का कुणाकडे काही इलाज
मोठीच गडबड झाली आज !

https://marathikavita.co.in/index.php?topic=56878.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २३ मे, २०२५

मोबाईलच्या नेटवर्कला २३०५२०२५ yq १२:४७:०७

मोबाईलच्या नेटवर्कला

मोबाईलच्या नेटवर्कला आसुसला पोर
वायफाय द्या हो जरा, करा उपकार

योग्य वेळी बिघडलो, शौकत रमलो
हाती नाही कामधंदा, झालो बेकार

नको आता मोबाईल, नको वायफाय
वेळखाऊ खेळ सारा, उपयोगाचा नाय

स्मार्टफोनचा हल्ली होतो अतीवापर 
बंधने लावा काही, ऐका हो सरकार

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २२ मे, २०२५

खोज २२०५२०२५ yq १५:३६:०८

खोज

कौन सा सुख है दुख में ये कौन जाने
बात सच्ची, दुख ही कहता है, गर माने

रहते है बहोत सारे सुख के बंधू,बांधव
दुख का मित्र वही है,जो दुख पहचाने

शाश्वत सत्य दुख सारे इस जीवन का
आता जाता जन्म मृत्यु संग सच माने

कैसे समझाएं किसे दुख की परिभाषा
कुद पडो खोजमें खुदके तो सुख जाने

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, १९ मे, २०२५

ढग आले दुरुनी

ढग आले दुरुनी

ढग आले दुरुनी, ढग आले दुरुनी
स्मरल्या का सगळ्या आठवणी?

भरधाव घोंघावणे वार्‍यांचे, आकाश सावळ्या रंगाचे
धावपळ वाढली लोकांची, नियोजनही नव्हते कोणाचे
ओढवली अशी आणीबाणी ...

नकोच आता ती अवकाळी, फक्त भरो शेतं तळी
नवजीवन मिळो धरेला, बळी घरी होवो दिवाळी
चमत्कार करावा देवा तुम्ही ...

शेतकऱ्यांचे कष्ट सरावे, शेतामधूनी पिक बहरावे
धनधान्य गृही वाढावे, गाली त्यांच्या स्मित फुलावे
देईल दान तो चक्रपाणी ...


https://marathikavita.co.in/index.php?topic=56572.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १८ मे, २०२५

रे मानवा १८०५२०२५ yq २०:४८:०७

रे मानवा 

प्रवास हा नजर रोखून वाटेवरचा 
अहमहमिकेत येथील जगण्याचा 

फसतो दुबळा न् कधी भक्ष्य होतो
अलिखित कठोर नियम निसर्गाचा 

शिस्तबद्ध सारीच यातायात मोठी 
तरीही जो तो अतुट भाग सृष्टीचा 

सारेच शांत आलबेल भूक नसता 
हस्तक्षेप नसतो कुणाला कुणाचा 

तरीही एक विनंती, तुला रे मानवा
सोड उद्योग अतिक्रमण करण्याचा 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ९ मे, २०२५

काही बाही उगा बरळती ०९०५२०२५ yq १५:१४:०७

काही बाही उगा बरळती

काही बाही उगा बरळती, नको नकोसे चाळे करती,
देशोदेशी भिका मागती, माथ्यावरती ड्रोन ते पडती,
खरोखर झाली त्राही, तो पाकिस्तान पाहिला बाई !

त्या देशाची बातच न्यारी, मनात साऱ्यांच्या द्वेष भारी,
काही अनपढ, खुप अडाणी, मर्दुमकीच्या बाता हाणी,
सारे नुसती तुलना करती, कुणी काही शिकत नाही !

नको पुस्तके नको शाळा, खाऊन पिऊन फक्त लोळा,
जगात साऱ्या गोंधळ घालू, आतंकवादी गोष्टी बोलू,
घेऊन शिक्षण ज्ञानी व्हावे, गरज त्यांसी वाटत नाही !

तिथे मुली ज्या जन्म घेती, परंपरेत अडकून जाती,
घराघरांत बॉम्ब बनती, मदरशा मधूनी ते जिहादी,
वाईट ते ते, सारे घडते, कमतरता कसलीच नाही !

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ६ मे, २०२५

आम्ही मोबाईलच्या


एका गँजेट संगे एकरूप झालो,
आम्ही मोबाईलच्या नादी लागलो ॥धृ॥

फेसबुक इंन्स्टा एकीकडे सुरु,
ट्विटरवर देखील ध्यान ते धरु
वॉट्सअँप तर आम्ही कोळूनी प्यालो..१ 
आम्ही मोबाईलच्या....

भुक हो मोठी लाईक कमेंट्सची,
त्याच्या पुढे कसली चव जेवणाची
कामधंदे पण सारे टाळू की लागलो..२
आम्ही मोबाईलच्या....

आयफोन ज्या कडे श्रेष्ठ तो झाला,
मागास म्हणती तो की पँड वाला
उगा एकमेकां आम्ही तोलू लागलो..३ 
आम्ही मोबाईलच्या....

https://marathikavita.co.in/index.php?topic=55888.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ५ मे, २०२५

डरा सा दिल ०५०५२०२५ yq १५:२४:०५

डरा सा दिल 

आजकल डरा डरा सा दिल रहता है
किसीसे बहुत कुछ कहना चाहता है

किस कारण सुननेवाला अभी अभी
पता नहीं कैसी नाराजगी दिखाता है

एकही धागे के बंधन में हम रहते हुए
रूखा रूखासा वह बरताव करता है

सोचो,कभी उतरें हम जीद पर अपनी
ना कहना फिर, हमें भी बुरा लगता है

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ३ मे, २०२५

साखर झोप

साखर झोप

नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी
होतात खरी, पहाट स्वप्ने, साखर झोप ती हवीहवीशी

वाहता मोगरगंध, मंद त्या कुंतलांचा
भास होता जरासा नाजूक पैंजणांचा
वेडावून देते हालचाल तुझी ती जराशी
मीही शोधतो किणकिण हात उशाशी...१
नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी

चाळवते झोप न् अंगभर उठतो शहारा 
मिठीत बद्ध होण्या तनू दे तनूस दुजोरा
बहरून गारव्यात अन् बिलगता उराशी
चालतो संवाद फक्त स्पर्शाचा स्पर्शाशी...२
नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी

हव्याहव्याशा तृप्तीने होता गात्रे सुस्त
अस्तव्यस्त तरी ही यौवन सुडौल पुष्ट 
वाटता, बोलावे पुन्हा मौनाने मौनाशी
लटका नकार न् डोळ्यात दिसते खुशी...३
नाते शब्दांचे जसे सुरांंशी तसे काहीसे माझे तुझ्याशी
होतात खरी, पहाट स्वप्ने, साखर झोप ती हवीहवीशी

https://marathikavita.co.in/index.php?topic=55761.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १ मे, २०२५

भाबडेपणा ०१०५२०२५ yq १६:२५:१०

भाबडेपणा

नाही ठाऊक फुलपाखराला
डायरीमधील फुल सुकले आहे!

कोरडलेल्या पाकळ्यांना पण
भावशून्य शब्दांची साथ आहे!

तरीही भाबडेपणा वेडा इतका
फुलपाखरू घिरट्या घेत आहे!

कुठवर जगावे आशेवर इतके
रंगीत गोजिरा छळभास आहे!

यावी ना,कल्पना या जीवाला
मोहात फसणे असे व्यर्थ आहे!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९