सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

हायकू २४९-२५१

#हायकू २५१

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २५०
असा माणूस
क्षणाला बदलतो
ऋतूच होतो २४-१२-२०१७

#हायकू २४९
हळूच उन
म्हणाले सावलीला
ये भेटायला २२-१२-२०१७

तथ्य


http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t30104/new/#new

गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

हायकू २४६-२४८

#हायकू २४८

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू २४७

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २४६

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

किंमत?

किंमत?

देहच होता गाव वेदनेचा 
वावटळ उठे चिकित्सेची,
विशेष उपचारां दरम्यान 
मर्यादा नसते सल्ल्यांची !

मोल चुकविता दु:खांचे
पडे कमतरता रोकडीची,
सोपस्कार करतांना पुर्ण
दमणूकच होते कुटुंबाची !

थेंब थेंब अश्रु चुकवितो 
किंमत नीत्य जगण्याची, 
रोज रोज आता प्रतिक्षा
उरे तीळ तीळ मरण्याची !

 © शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t30081/new/#new

भावार्थ

भावार्थ

असचं असतं प्रेम
सगळ्यात अर्थ शोधणारं,
स्वतःस झोकून देता
खरोखर भावार्थ जपणारं !

© शिव 🎭
442/19-12-2017

महत्त्व

महत्त्व

छळणे एकांती कधी
कामच आहे त्यांचे,
म्हणुनच नेहमी वाढते 
महत्त्व आठवणींचे ! 

©शिव🎭
441/19-12-2017

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

करमणूक

करमणूक

जागोजागी
आहेत असे सिग्नल
उघड्या वास्तवाची गँलरी
मांडल्या सारखे
काही आडून पाहतात
बरेच फाडून पाहतात
नजरा जुळताच
ढळून पाहतात...
प्रेक्षकच ते...
फक्त मिनिटं भराची
करमणूक
करून घेतात,
उघड्या देहाची...

© शिवाजी सांगळे 🎭
१९-१२-२०१७

धम्माल

धम्माल

गोष्ट आता भरात आहे
सारी गोडी चहात आहे

कष्टानेच जींकलो दोस्त
डंका आज शहरात आहे

ऊदो ऊदो हवाय मोठा
ढोली ताशा सुरात आहे

बाजी जिंकून घेतली मी
धम्माल सुरु वरात आहे

माझे तूझे कशास म्हणू
विश्वच सारे घरात आहे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30057/msg70183/#msg70183

कयास


http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30047/new/#new

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

वसा



http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t30043/msg70151/#msg70151

हायकू २४३-२४५

#हायकू २४५

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २४४

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २४३

छायाचित्र सौजन्य: कु. पुर्वा शेंडे

मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

हायकू २४०-२४२

#हायकू २४२

छायाचित्र सौजन्य: कु. पुर्वा शेंडे

#हायकू २४१

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २४०

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

हायकू २३७-२३९

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २३९


#हायकू २३८


#हायकू २३७


बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

नव्याने आलो

नव्याने आलो
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29911/new/#new

हायकू २३४-२३६

#हायकू २३६

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २३५

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २३४

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

हायकू २३१-२३३

#हायकू २३१

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू २३२

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २३३

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

दे...दे

दे...दे

माळ म्हणतो जरा वारा दे
समुद्र म्हणतो जरा किनारा दे

पाणी म्हणते जरा निचरा दे
सावली म्हणते जरा आसरा दे

छत म्हणते जरा निवारा दे
तिजोरी म्हणते जरा पहारा दे

विज म्हणते जरा खतरा दे
पक्षीणी म्हणते जरा चारा दे

श्रीमंती म्हणते जरा डोलारा दे
माणुसकी म्हणते जरा सहारा दे

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29952/new/#new

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

हायकू २२८-२३०

#हायकू २३०

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २२९

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २२८

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

हायकू २२५-२२७

#हायकू २२७

छायाचित्र सौजन्य: गुगल

#हायकू २२६

छायाचित्र सौजन्य: श्री शिवाजी सांगळे

#हायकू २२५

छायाचित्र सौजन्य: गुगल

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

हायकू २२३-२२५

#हायकू २२५


#हायकू २२४


#हायकू २२३
वाऱ्याचा स्पर्श
सळसळली पाने
प्रणय गाणे १७-११-२०१७

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

ठेकेदार



 http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29861/new/#new

हायकू २२०-२२२

#हायकू २२२
जग रहाटी
पासष्टावी ही कला
बोलकी पाटी १६-११-२०१७

#हायकू २२१
उन खेळते
धुक्यातल्या दवाशी
रंगाची नक्षी १६-११-२०१७

#हायकू २२०

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

आहे... आहे



http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29848/new/#new

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

तंत्रज्ञान गाथा

तंत्रज्ञान गाथा

अती नेट युगी, होईलच माती !
करावा तो किती, अट्टाहास !!

फेसबुक चँट, ते वाँट्स अँप !
येवु न दे झोप, कुणालाही !!

रात्रंदिन घोर, लाईक कमेंट !
लागे पुर्ण वाट, तब्येतीची !!

निशाचर वारी, कधी तरी बरी !
सकलां विचारी, सुख दु:ख !!

अखंडित डेटा, सर्वांचीच व्यथा !
तंत्रज्ञान गाथा, वदे शिवा !!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t29851/new/#new

हायकू २१७-२१९

#हायकू २१९
थंडीचे वारे
लागे उन्हाची आस
थोड्यात पुरे १४-११-२०१७

#हायकू २१८
लेक लाडकी
निघली सासुरासी
डोळ्यात पाणी १३-११-२०१७

#हायकू २१७
निळ्या जळात
उतरला आसमंत
तरंग डोहात १२-११-२०१७

©शिव

मला_वाटते... जबाबदाऱ्या

जबाबदाऱ्या

खांद्यावर हात ठेवणारं घरात कोणी वडिलधारं  नसेल तर आपण फार मोठं, पोक्त झालोत असं उगाच जाणवतं. मग जेव्हा वास्तविक जीवना पेक्षा व्यवहारीक जीवनातल्या लहान मोठ्या सर्व जबाबदाऱ्या अंगावर येउ लागतात तेव्हा ते हळूहळू पटूही लागतं, आणि पुढे पुढे प्रयत्न करून त्या जबाबदाऱ्या निभावल्या पण जातात, परंतु खरी कसोटी तेंव्हा लागते जेव्हा एखादा महत्त्वाचा वा मोठा निर्णय घ्यावा लागतो.

काही जणांना वाटेल त्यात काय नविन आहे? सगळ्यांनाच तर यातून जावं लागतं., बरोबर आहे ते, अशावेळी परीस्थिती तुम्हाला आपोआप बळ व बुद्धी देते, आणि त्यातूनही तुमची वेळ चांगली असेल तर अवघड जबाबदारी सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडली जाते, निभावली जाते आणि त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढतो, जरी काही चुकीचं घडलंच तर कैक प्रकारचं नुकसानही वाट्याला येतं, तरीही त्यातुनही एक नवा धडा शिकायला मिळतो, नवा अनुभव मिळतो मोल देवून घेतलेला.

काहिंच्या बाबतीत या जबादाऱ्या फार लवकरच त्यांच्या खांद्यावर पडतात आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे त्या निभावल्या सुद्धा जातात तसेच काही वेळा फार मोठा अनुभव पण देऊन जातात. असे लोक नंतर पुढील आयुष्यात सहसा धीटपणे व आत्मविश्वासाने जीवन जगतात व आपल्या क्षेत्रात नावलौकीक प्राप्त करून यशस्वी होतात.

#मला वाटते...शिवाजी सांगळे©
३२/१४-११--२०१७ 🦋

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

आयुष्य

आयुष्य

प्रेमात झोकलेलं
आहे आयुष्य
त्यागाने व्यापलेलं
आहे आयुष्य
न उलगडलेलं कोडं
आहे आयुष्य
जगणं समजलं तर,
सोप आहे आयुष्य
नसमजता जगलो तर,
कठीण आहे आयुष्य
समजून बिघडवलेलं
गणित आहे आयुष्य

©शिवाजी सांगळे 🦋
12-11-2017

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

हायकू २१४-२१६

#हायकू २१६
बोचरा वारा
पहाट खेळ सारा
अंगी शहारा १०-११-२०१७

#हायकू २१५
रौद्र थैमान
तरंगते जहाज
दोलायमान ०९-११-२०१७

#हायकू २१४
ऋतूचे रंग
हवेत ये तरंग
मन हो दंग ०८-११-२०१७
©शिव

डोळ्यात तुझ्या

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29819/new/#new


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

मैत्री

मैत्री
मैत्रीत कधी साँरी थँक्स
मुद्दामहून आणू नये,
मोकळेपणाने बोलताना
औपचारिकता पाळू नये !

#शिव©
430/08-11-2017

मौन

मौन
मौनाची बोलकी भाषा
जागवी मनात आशा,
कधी उत्साही आनंद
कधी अबोल निराशा !
#शिव
 429/03-11-2017

हायकू २११-२१३

#हायकू २१३
धुके दाटले
चमके दव बिंदू
एक लोलक
#शिव ०७-११-२०१७

#हायकू २१२
ऋतू गारसा
कवडसा उन्हाचा
हवा हवासा ०६-११-२०१७

#हायकू २११



सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

हायकू २०८-२१०

छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २१०


#हायकू २०९


#हायकू २०८



गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

शहर

शहर

http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29768/new/#new

हायकू २०५-२०७

#हायकू २०७
आल्हाद गंध
दे सुवर्णचंपक
मन प्रसन्न ०१-११-२०१७

#हायकू २०६
दव पहाट
पाखरांचा रियाज
किलबिलाट ३१-१०-२०१७

#हायकू २०५
वाऱ्याचे येणे
हळूवार स्पर्शने
सुरेल गाणे २९-१०-२०१७

रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

हायकू २०२-२०४

#हायकू २०४
छायाचित्र सौजन्य: गुगल


#हायकू २०३
माणिक मोती
देणं हे निसर्गाचं
दव बिंदूचं २६-१०-२०१७

#हायकू २०२
छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर


आत्महत्या

उरी सतत चिंता घेऊन जगणाऱ्या बळीराजाच्या आक्रोशाची ओळख करून देणाऱ्या एका #संहितेतील भावनांना कवितेत मांडण्याचा प्रयत्न पुढील #आत्महत्या कवितेत केला आहे... 

#आत्महत्या

अशीच आवस्था आमची
आभाळासबी दया वाटंना,
भुईला नाही थोडसं पाणी 
शेतामधी पण पिक येईना !

भोग कसले वाट्यास ईथं
मनी मरणाचा पिंगा घुमतो,
यातना ह्या सोसता सोसता
आत्महत्येचाच ईचार येतो!

'अज्ञानात सुख हाय म्हणं'
आमीबी ठाई ठाई ऐकलय,
शिक्षाण घेऊन काय झालं?
दारिद्र्यच वाट्याला आलयं!

आता तरी काढा हो झापडं
डोळ्यांवरची ती पांघरलेली,
जाण ठेवा तुम्ही सरकार हो
व्यवस्था बळीनं सावरलेली!

©शिवाजी सांगळे 🦋 २६-१०-२०१७

धडपड

एका मित्राच्या विनंती नुसार "नोकरी गेलेला, बेकारीला कंटाळलेला व एका मुलीचा पिता असलेला तरूण मुलीच्या भविष्यासाठी नाईलाजाने तृतीयपंथी असल्याचे सोंग करतो... व पकडला जातो"
या प्लाँटवर आधारित एक छोटी #संहिता व तीला पुरक अशी पुढील #धडपड कविता लिहून देण्याचा योग आला...
छान वाटतयं...

#धडपड

असुनही मी पुरुष सुद्धा
ईच्छा नाहीच हो माझी,
कपडे बाईचे अंगी वापरणं
सवय नाहीच हो माझी !

नका हेटाळू तुम्ही मला
पोटासाठी धडपड माझी,
दु:ख वाट्यास मुलीच्या
न येवो कधी ईच्छा माझी !

शिक्षण, नोकरी, आरोग्य
सर्वांस प्राप्त आस माझी,
मिळो सर्वांना सुखशांती
हीच प्रार्थना आहे माझी !

#शिवाजी_सांगळे© 🦋 २६-१०-२०१७

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

हायकू १९९-२०१

सर्व छायाचित्र सौजन्य: श्री प्रकाश नेवासकर

#हायकू २०१


#हायकू २००


#हायकू १९९