शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

योगीराज


योगीराज

म्हणे कोणी आहे, नित्य निराकारी!
वसे चराचरी, तो ईश्वर!!१!!

सावळा म्हणोनी, लागे कुणा लळा!
देखीला का डोळा? परब्रम्ह!!२!!

वंश ज्याचा असे, सर्वा भुतां जगी!
तोची आत्म योगी, योगीराज!!३!!

झाकता अंतरी, गवसला अंश!
असे जो परमेश, जगताचा !!४!!

जगोनी भ्रमात, व्यर्थिले जीवन!
दिले दोष दान, देवाजीस !!५!!

म्हणे शिवा ऐसे, उगा मनी आले!
देवाजी जाणिले, दोषा परी!!६!!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t27407/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा