माझी मराठी
माझी माय मराठी मी मराठी
बोलतोत आम्ही गोड मराठी
पिकल्या फळाची गोड गाठी
आंब्याची जणू फोड मराठी
प्रेमात मराठी, रागात मराठी
तेजात मराठी ज्ञानात मराठी
माजात अन् त्यागात मराठी
विसरू नका, सर्वांची मराठी
अटकेपार, परदेशात मराठी
उंचावते जगती शान मराठी
मान मराठी अभिमान मराठी
सामावून घेते सर्वांना मराठी
© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/preranadai-kavita/t27499/new/#new
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा