सोमवार, २४ जुलै, २०१७

हायकू

#हायकू १२०
झाडांच्या पाना
जोजवी वात पान्हा
सारे पहा ना २४-०७-२०१७

#हायकू ११९
तीच्या बटांना
छळतो मुक्त वारा
मला शहारा २४-०७-२०१७

#हायकू ११८
पाउल तिचे
जरासे रेंगाळले
अश्रु झरले २३-०७-२०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा