मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

निरोपाची वाट ३११२२०२४ ya २३:४६:०९

निरोपाची वाट

निरोप २०२४ ला आपसूकच दिला जाईल 
दिल्याने निरोप खरं का तो विसरला जाईल

बरं वाईट किती अन् काय काय त्यानं दिलं
संदर्भ आणि इतिहासात, तो कायम राहील

असाच अखंड चालणारा, हा काळ प्रवास
नव्या कोऱ्या सुखांची पुन्हा निर्मिती करील

कर्तव्य,काम सुरू राहो आपल्या ठिकाणी
येणारा नवा फळ मात्र निश्चित योग्य देईल

अव्याहत चालते, रीत इथल्या वहिवाटीची
पावलागणिक खरं खोटं ती नक्की दाविल

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

अज्ञात वारकरी

अज्ञात वारकरी

शोधात कोण कोणाच्या इथवर मागोमाग चालले
वाट होती एकाकी, चालण्याचे तेव्हा भान कसले

भोळेभाबडे सारे, इथल्या अज्ञात पंढरीचे वारकरी
भास आभासात भेटले कित्येक, नाते असे कुठले

चाचपडता एक दूसऱ्यास कुणीच ना इथे कुणाचा
सोंग खरेखुरे तरीही बघ प्रत्येकाने हुबेहूब वठविले

ओढ अंतरीची जरी पदोपदी त्वा दावली कुणाला
आपल्यात दंगलाय जो तो, भान का त्यास उरले?

कुणा ठाऊक चालणार कुठवर ही वाटचाल अशी
देणे हे संचिताचे म्हणावे की फळ कर्माचे लाभले?
https://marathikavita.co.in/index.php?topic=49240.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

स्मरण

स्मरण

कित्येक घडले येथे काळ्यावर पांढरे करून
रडले तरी शिकले खुप काही मारुन मुटकून

एक एक धडा इथला आयुष्यात कामी येतो
उगाच का प्रत्येक जण अवघे जीवन जगतो

वाटले नकोसे, काही धडे इथले कधीकाळी
पटते आता, बरेचसे येतात कामी वेळोवेळी

तरीही खंत एक उरात दडली का कुणा ठावे
विखुरले सवंगडी सोबतीचे त्यां कुठे शोधावे

धरून हात, ज्यांनी जीवनाचे ते धडे गिरवले
वळणावर आयुष्याच्या गुरुजन सारेच स्मरले
https://marathikavita.co.in/index.php?topic=49209.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

ख़ूबसूरत जीवन

ख़ूबसूरत जीवन

बहुत ख़ूबसूरत है जीवन अगर सोचों तो
हर पल मिलती है एक राह नयी देखो तो

आता है वक्त अच्छा बुरा सबके जीवन में
गुजरता हैं खुशहाल सफ़र अगर चाहों तो

रोज रोज मिलता है, सुरज कि किरणों से
अवसर नया एक हमें गौर से पहचानो तो

एक एक हलचल, सिखातीं है प्रकृति की 
जीवन की नयी सही हुनर कुछ सिखो तो

https://marathikavita.co.in/index.php?topic=49062.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

पोकळी

पोकळी

बंद दरवाजा, हि वाट एकाकी मोकळी
आसक्ती म्हणू की ओढ तुझी गं वेगळी

फोडावयास कोंडी आतूरल्या भावनांची 
सज्ज आहे निरागस, सांज एक सोवळी

भासतात का इथे स्पंदने मनाची मनाला
शांततेत इथल्या, तुझी न् माझी आगळी

शोधात तुझ्या, पायपीट इथवर जाहली
चाहूल ना कुठे तुझी मनी रिक्त पोकळी

सोहळे ऋतूंचे सर्व होतात त्यांच्या तऱ्हेने
का समजावी भेट आपली कुणी निराळी

https://marathikavita.co.in/index.php?topic=48974.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

शेतकरी १३१२२०१४ yq १७:२५:४५

शेतकरी

स्वप्नात जगणाऱ्यांना
कष्टाची किंमत काय कळणार
पिझ्झा, बर्गर पिढीला
कष्टाळू शेतकरी कसा समजणार

रस्त्यावर यांची घासाघीस
मॉलमध्ये मुकाट एमआरपी देणार
शिकवायला मोल मातीचं
कोणतं बायोटेक कॉलेज पुढे येणार

वात्रटिका, 13-12-2024 YQ 05:25:45 PM

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

सैरभैर वारा

सैरभैर वारा

वाहतोय सैरभैर मी वारा झालोय...
ओलांडून दऱ्याखोऱ्या मी भेटण्या आलोय

घेऊ म्हणतो विश्रांती क्षणभर येथे...
खबरबात प्रवासाची साऱ्या देण्या आलोय

किती ते गंध, रंग फुला माणसांचे...
ओळखू कसे खरे खोटे विचारण्या आलोय

कसे हे देणे प्राक्तनाचे मज भाळी...
चालेल कुठवर प्रवास हा जाणण्या आलोय

सगळेच कसे अनिर्बंध घडते येथे...
सैल का नियंत्रण?नियंत्या पाहण्या आलोय

https://marathikavita.co.in/index.php?topic=48488.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९