लुटालूट
एकाच माळेचे सगळे हे मणी
उखाळ्यापाखाळ्या बघा काढू लागले,
विसरून स्वतःची पुर्व कर्मे
वैयक्तिक गंभीर आरोप करीत सुटले!
राजकारणाच्या स्वच्छ धंद्यात
कुणाशी कायम शत्रुत्व असते कुठले?
काही दिवस तुझं माझं करून
स्वार्थापोटी युती करायची, हे असले!
जमेल तसे, अन् जमेल तेवढे
सत्तेचे खरे सुख यांनी उपभोगून घेतले,
जनहित म्हणत,दिशाभूल करुन
आपल्याच पोळीवर तुप ओढून लुटले!
https://marathikavita.co.in/index.php?topic=66925.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा