बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

शोधात स्वतःच्या ०११०२०२५ yq १५:२५:०५

शोधात स्वतःच्या

स्वतःच्या शोधात कुठवर आता फिरायचे 
कोण आपले, कोण परके कसे शोधायचे

आहे कुठे वेळ एवढा, सांभाळण्या नाती
खाद्यासाठी दिवसभर फडफडत रहायचे

वाट्याला जे आले, ते समजून मधूर सारे
पंखावरले वर्ख,सह्रदयांस मुक्त वाटायचे

अल्पजीवी नाते, अल्प जीवन आहे तरी
घेत स्वानंद, मनमुराद चौफेर बागडायचे

कोण आपले, कोण परके कसे शोधायचे
स्वतःच्या शोधात कुठवर आता फिरायचे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा