शुक्रवार, २० मार्च, २०२६

छुपे चेहरे

छुपे चेहरे

छुपे रहते है चेहरे के पीछे चेहरे !
अक्सर कई अजीबोगरीब चेहरे !

मौसम की तरहां, वक्त वक्त पर
बदल जाते है, ये ऐसे छुपे चेहरे !

लगती होगी शर्म, गिरगिटों को 
तोहमत ऐसी लाते है झूठे चेहरे !

मुश्किलों भरा, दौर है यह मानो
समय के चलते,पढा करो चेहरे !

https://marathikavita.co.in/index.php?topic=76812.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १९ मार्च, २०२६

दोन्ही देही

दोन्ही देही

एक सुर, एक नाद
'मं त्र मु ग्ध' अंतरात..!
शामरंगी कृष्णछाया 
खोलवर, या मनात..!

स्वर जादू बासरीचा 
ताल ठेका पावलांचा..!
देह भान 'ह र व तो' 
प्रभाव हा सावळ्याचा..!

ताल तुझा, सुर तुझा
दोन्ही कंठी,एक तान..!
राधाकृष्ण, नाम एक
दोन्ही देही, एक भान..!

https://marathikavita.co.in/index.php?topic=76729.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, १८ मार्च, २०२६

प्रवृत्ती

प्रवृत्ती

तुझ्या उपकारा या, कसे तोलावे कुणी?
अनंत हाताने दिले,त्यांस मोजावे कुणी?

करतो मनमानी, मानवच स्वार्थी येथला 
विकृतीस त्याच्यातल्या आवरावे कुणी?

टोलवितो कधी, भावना विचार प्रेम सारे 
बदल रे मानसिकता, त्यां सांगावे कुणी?

लालसा, हाव,ओढीने सतत स्वैर धावते
अशा धावऱ्या या मनास सावरावे कुणी? 

मी, माझं, मलाच्या चक्रात गुरफटलेल्या
प्रवृत्तीला आजच्या, येथे सोडवावे कुणी?

https://marathikavita.co.in/index.php?topic=76713.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १७ मार्च, २०२६

गणित काळाचे

गणित काळाचे

जिर्ण झाली पुस्तके, शुष्क झाली फुले,
बदलले चित्र हे कालौघात स्पष्ट झाले!

रंग विरला नी गंध हरवला पाकळ्यांचा
मुखपृष्ठ, साजिरे पुस्तकाचे काळवंडले!

भावना, विचार, संवेदना का हरवल्या?
शोधता शोधता हळूवार मन व्याकुळले!

कुठवर साथ, अन् त्यांना उरी बाळगावे
प्रश्न एकाएकी, मनी आज का प्रकटले?

जपावा अंता पर्यंत ठेवा उगा का वाटते
त्यांना ना मला,गणित काळाचे उमगले!

https://marathikavita.co.in/index.php?topic=76709.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ७ मार्च, २०२६

दर्शन बारी

दर्शन बारी

देवा तुज दारी, उभा तास भरी
जरा ही हलेना, दर्शनाची बारी

घ्यायचे दर्शन, स्वामींचे म्हणूनी
घेतली मी धाव, तुमच्या चरणी

कुठूनी कुठूनी, भक्तजन येती 
नियोजनामुळे, त्रासून रे जाती

अताशा सर्वत्र, असेच का होते
देवळा, मठात, गर्दी मोठी होते

गर्दीच्या रेट्यात, तु का हरवतो?
गाभाऱ्यात फक्त पुतळा असतो

https://marathikavita.co.in/index.php?topic=76662.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ३ मार्च, २०२६

जाहिराती न् सेवा


जाहिराती न् सेवा

एक म्हणे घरबसल्या लग्न जुळवा
दुजा म्हणे स्वस्तात औषधं मागवा

तिसरीची तर बुवा, वेगळीच तऱ्हा
मी सांगते तिथे खुशाल पैसे गुंतवा 

A I भविष्याने,भलं बुरं काय होतं?
न् म्हणती, अँप डाउनलोड मारावा

भाजीपाला,दुधाचा पण बोलबाला
श्रेष्ठत्वाचा टेंभा तुम्ही मान्य करावा

जो येतो तो भारी, फक्त सल्ले देतो 
जाहिरातींमधून आमचा धंदा व्हावा

स्वार्थी सेवादारांच्या या भाऊगर्दीत
ग्राहकाचा विचार तो कुणी करावा?

https://marathikavita.co.in/index.php?topic=76660.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २ मार्च, २०२६

ओलावा ०२०३२०२६ yq १०:२३:३५


ओलावा
 

नाही जाणवत हल्ली...
प्रवासातला हवाहवासा गोडवा
सडकेवरचा तो डांबरी ओलावा
दूर दूर पर्यंत, अगदी खेड्यात सुद्धा

सारवले जात आहेत...
रस्ते, गल्ल्या कोरड्या कॉंक्रीटने
वेगळा खरखरीत, शुष्क अनुभव
आतपर्यंत, अगदी मनामनात सुद्धा

अशातच ऋतू, मौसम..!
कोण ठेवणार त्यावर ताबा?
तो ही वेड्यागत होतो, कधीमधी

पण, अपण तर काही करु शकतो?
एकट्याने वा एकमेकां सोबत सुद्धा

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

ऋण-ओव्या

ऋण-ओव्या

आपोआप सुचते गं, जात्यावरी ओवी 
किती सांगू गं आता, मराठीची थोरवी...१

ज्ञानोबाने सोपी केली,देवाची गं गीता
अशी गोड भाषा, सारे वाचतोय आता...२

झाले कैक अत्याचार मिटवण्या तिला
तरीही तगली माय,सोसून अन्यायाला...३

संतांनी जोपासली, अभंगाच्या रुपाने
गायल्या कुणी ओव्या,कुणी भारुडाने...४

वारसा हा थोर, दिला जो आपल्याला
झेंडा या मराठीचा, भिडवूया गगनाला...५

बाळपणी वाढलो, बोलूनी बोल जिचे
करु प्रयत्न जरासे,फेडण्या ऋण तिचे...६

https://marathikavita.co.in/index.php?topic=76659.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

मराठी

मराठी

प्रांतवार बदलते माय मराठी 
तरी सर्वां सोपी, माय मराठी ! 

येतो जो जो येथे, टेकतो येथे
प्रत्येकास त्या पोसते मराठी !

वंदितो कधी चुकून कुणीतरी 
कधी अपमान सोसते मराठी ! 

गौरविली, अभिजात म्हणूनी 
मुळी श्रेष्ठ होती, आहे मराठी !

जन्मलो मातीत या थोर भाग्य 
बोलती सारे जिथे माय मराठी !

https://marathikavita.co.in/index.php?topic=76658.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

संपत्ती

संपत्ती 

खरी संपत्ती कोणती समजावी?
धनदौलत की तब्येतीस मानावी?

कलीयुगाचा जरा विचार करता 
देही,मनी लवचिकता रे असावी!

वारसा, शिकवण क्षीण होताना
रीतीरिवाज हल्ली बदलू लागले!

अनुकरण करणाऱ्या पिढी संगे
आई बाप सुद्धा, रे नाचू लागले!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

जगाच्या रंगमंचावर

जगाच्या रंगमंचावर

कुठे असतो, जगाच्या या रंगमंचावर आपण? 
जवळ असून असतो काही अंतरावर आपण! 

भास आभासाचा पूर्वनियोजित हा खेळ सारा 
कसा, किती आणि कुठवर खेळणार आपण? 

हळूवारपणे वेढून घेते ती अज्ञात गूढ पोकळी 
वास्तवात विचार करतो का सारासार आपण!

मानतो स्वतः सुक्ष्म अस्तित्व ब्रम्हांडात आपले
तरी जिद्द गगनाला गवसणी घालणार आपण!

साधा, तरी अमर्त्य विचार मानवाचा या जगती
शाश्वत कुतूहलाने, ठरवूनच चालणार आपण!

https://marathikavita.co.in/index.php?topic=76657.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

मुक धडपड























मुक धडपड

आरशात स्वतःला बघतांना...
होते नव्याने ओळख स्वतःची

कधी कोणते चढवले मुखवटे
शोधते मन, ती उत्तरे स्वतःची

सापडतो कधी अट्टल आतला
कधी नक्कल करी दुसऱ्याची

अशीच तऱ्हा, प्रत्येकाची येथे
करूनी झाकतो चूक स्वतःची 

स्थितप्रज्ञ तो, बिचारा आरसा 
पाहतो मुक धडपड चेहऱ्याची

https://marathikavita.co.in/index.php?topic=76346.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

प्रेम सप्ताह ओव्या ०७०२२०२६ yq १५:१०:१०

प्रेम सप्ताह ओव्या

पहिली माझी ओवी रे रोज डे च्या नावाने     
द्यावे गुलाब पुष्प प्रेम करणाऱ्यांना प्रेमाने

दुसरी माझी ओवी रे, प्रपोज डे निमित्ताने
मागणी घालावी खुशाल, निर्लज्ज मनाने

तिसरी माझी ओवी रे,चॉकलेट च्या गोडीने
द्यावे, घ्यावे खुप चॉकलेट हावरट भावनेने

चौथी माझी ओवी रे,टेडी डे तो असल्याने
झालं प्रेम तर ठिक, नाहीतर उगा उंडारणे 

पाचवी माझी ओवी रे,प्रॉमिस डे कारणाने
पाळावीत वचने!म्हटलं कुणाच्या काकाने 

सहावी माझी ओवी रे, हग डे च्या अमिषने
माराव्या मिठ्या त्यांना हव्या ज्यांना चवीने

सातवी माझी ओवी रे किस डेच्या ओढीने
सार्थक होते प्रेमाचे, हळूवार किस घेण्याने

आठवी माझी ओवी रे,वैलेंटाइन स्मरणाने
होऊन गेला संत जो स्वतःच्या बलीदानाने

नववी माझी ओवी रे अनुकरण हे केल्याने
रोज वागा प्रेमाने शिकवले आपल्या धर्माने

दहावी माझी ओवी रे ज्ञानोबाच्या ओळीने 
'भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे' या स्मृतीने

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

अलविदा ०७०२२०२६ yq १२:०९:३७

अलविदा

असंतुष्ट मानवाने
जन्म मला दिला
वाढलो, फोफावलो
वेळप्रसंगी कामी आलो
माणूस... वापरतच होता!
वेळ बदलली, काळ बदलला
महत्त्वाचं म्हणजे
माणूस बदलला...
मी...तसाच कसा राहणार?
माझेही रुप पालटले...
भोवती कोंडळं करून राहणारे..!
आज खिशात घेऊन फिरु लागले!
खालावलो, अपमानित झालो,
बरीच नैतिकता होती,
नव्या रुपात ठार हरवली...
मी राहून काय करु?
अलविदा

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

किल्ली ०६०२२०२६ yq २०:०३:५३

किल्ली 

बघ खात्री पटेल तुला एकदा
शाश्वत या साऱ्या सृष्टीची 
एक एक बीज रुजते
येथे थोर कष्टाने
सावध हो, मानवा
वेळीच अजून
अती उन्माद तुला 
दावेल किंमत जगण्याची 
श्वासागणिक जळते माती
अहोरात्र ध्यास धरून
ठेव भान जरा त्या कष्टाचे
करतोस चिंता सदैव स्वतःची
प्रयत्न कर जरासे
सापडेल किल्ली समाधानाची!

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

अर्ध-संकल्प























अर्ध-संकल्प

एकीकडे, रोजगाराची कमी
खाजगीकरणाचा जोर आहे !

सवंग लोकप्रियते साठी इथे
योजनांचीच जाहिरात आहे !

विकासाने, काँक्रीट वधारले
सोबत टोलधाड आली आहे !

कागदावरच्या आकडेमोडीत
भुलथापांचा सारा खेळ आहे !

जीडीपी, महासत्तेच्या नादात
महागाई मोकाट सुटली आहे !

हे स्वस्त, ते स्वस्त, ऐकतांना
सर्वसामान्य खरा बेजार आहे !

शिक्षण, शेती निराधार होताना
करदात्यांमुखी शिळे पान आहे!

https://marathikavita.co.in/index.php?topic=75998.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

अति तिथे माती

अति तिथे माती

"गणपत वाणी बिडी पिताना" या बा.सी. मर्ढेकर यांच्या प्रसिद्ध कवितेवर केलेली एक विडंबन रचना.

"गणपत वाणी बिडी पिताना"
ऐकायचा नुसती मोबाईलवर गाणी!
फिरवून हात ढेरीवर म्हणायचा
गाण्यात सर्वांना मी पाजिल पाणी!

कानावरती मग हात ठेवूनि
जोर जोरात द्यायचा गड्यास हाळी!
तुही ऐकले माझे सुरेल गाणे
तर मग आता दे मला हातावर टाळी!

खुशीत येता जो गणपत वाणी 
द्यायचा गड्याला मग एखादा आना!
मळकट उशीवर बैठक मारुनी
फिरून मारायचा तानांवरती ताना!

वेड मोबाईलचे इतके वाढले
धंद्यावरुनी त्याचे सारे लक्षच उडले!
कान बहिरे, डोळे क्षीण झाले न्
धंद्यासह वाणी मात्र कायमचे बुडले!

https://marathikavita.co.in/index.php?topic=67359.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

वळणांवर

वळणांवर

जीवनाच्या प्रत्येक वळणांवर
घडणारच काही तरी हमखास 

असो वा नसो, मनात कोणता
हवा नकोसा भलाबुरा हव्यास 

वाटेवरती वळण,पाण्यात लाट 
प्रवृत्त करते, घेण्यास आदमास 

सावरता वेळ, तेवढी सारासार
खात्रीने सुखरूप होईल प्रवास

https://marathikavita.co.in/index.php?topic=75283.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

अज्ञात अस्तित्व























अज्ञात अस्तित्व

मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
असतेच एक अस्तित्व अज्ञात 

वेडाने पछाडलेले काही वेडे
दवडतात आयुष्य शोधण्यात

विचारांचे झालेले मुटकुळे
विस्कटते मात्र मोठ्या वैविध्यात 

फिरून भरकटलेले हे मन
गोंधळते अज्ञाताच्या सानिध्यात

अखंड अविरत शोध सारा
थांबवू पाहता क्षणभर थकतात

नको नको म्हणताना पुन्हा
मनाचे वारू बेलगाम उधळतात

https://marathikavita.co.in/index.php?topic=75222.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

पटकथा

पटकथा 

आठवणींच्या धाग्यावर, नाती ही बेतलेली 
प्रेम,आपुलकीची धग अखंड ती चेतलेली 

स्मृतीतला इतिहास, गतकाळची आठवण 
सदैव राहते एक एक मनचक्षूंवर कोरलेली 

अंत ना पार येथे, अव्याहत स्मरणचक्राला
प्रत्येकचीच नाळ त्याच्या सोबत जोडलेली

रोज रचली जाते वेगळी पटकथा नात्यांची
छळ,कपट आणि अविश्वासावर बांधलेली

कधी माझी तुझी,कधी आपली म्हणताना 
व्यवहारीक गणितांवर आजकाल रेटलेली

https://marathikavita.co.in/index.php?topic=75217.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

नवीन पर्व










नवीन पर्व

        काही गोष्टी आपण ठरवतो त्यानुसार होतातच असं नाही, आणि असं काही झाल्यावर होणार त्रागा, अपराधीपणाची भावना सतत बोचत राहते, अर्थात 'वेळ' त्यावर आपली जादूई फुंकर घालून ते शल्य कमी करायचा प्रयत्न करते एवढं मात्र खरं. निमित्त असं झालं की दि. १० जानेवारी'२६ रोजी बाळासाहेब ठाकरे ऑडोटोरीयम, स्वारगेट, पुणे येथे #अंतर्नाद_काव्यमंच द्वारे आयोजित तिन काव्यसंग्रहांचे प्रकाशन, त्याच दिवशी पुण्यात संध्याकाळी भाचीचा विवाह सोहळा आणि दि.११ जानेवारी'२६ रोजी कस्तुरबा गांधी सभागृह, माटुंगा, मुंबई येथे माझ्या #महालेखाकार_कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनाचे नियोजित होते, आणि या तीनही कार्यक्रमांना उपस्थित रहायचे ठरवले देखील होते, पण... म्हणतात ना 'man proposes, god disposes' !

        उद्या पुण्यातील कार्यक्रम कसा होईल, कोण कोण भेटतील या आणि अशा असंख्य प्रश्नांचा पिंगा रात्रभर डोक्यात होता, अपुऱ्या झोपेतून सकाळी उठलो आणि त्याच नादात बाथरूममध्ये पाय मुरगळून घेतला, आणि डोक्यासह साऱ्याच नियोजनावर पाणी पडले, दुखापतीचा उगाच आणखी काही व्याप वाढू नये म्हणून नाईलाजास्तव कार्यक्रमात जाण्याचा बेत रद्द करण्याची नोबत आली. काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात उद्घाटक म्हणून काय बोलायचे, "गीतकाव्य" संग्रहाची प्रस्तावना लिहिताना काय विचार केला, आपलं मनोगत कसं मांडायचं वगैरेची मानसिक तयारी पण मस्त जमून आली होती, परंतु माझ्या दुर्लक्षामुळे जसा अपघात घडला, त्या क्षणी मन खिन्न झाले, आपण एका चांगल्या आणि आवडीच्या कार्यक्रमात हजर राहू शकणार नाही याचे वाईट वाटत राहिलं.

        म्हणतात ना वेळेची जादूई फुंकर ते शल्य कमी करते तसं काहीसं झाल, या करता आजच्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग मला तरी जाणवला, म्हणजे १० तारखेच्या कार्यक्रमातील उपस्थित सर्व कवी/कवियत्री त्या दिवशी व रात्री सुद्धा भारलेल्या अवस्थेत होते, अर्थात हे जाणवलं ते वॉट्स अँप तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुसऱ्या दिवशी त्या सर्वांची मनोगते, अनुभव, जमतील तशी टिपलेली छायाचित्रे समूहावर येऊ लागली, आणि इकडे ते सर्व पाहून, वाचून हरखून जात होतो. 

        दरम्यान ११ तारखेच्या स्नेहसंमेलनाची, खास करून आमचे #गणेश_शेंडे #हिंगोराणी व #चेतन_जोबनपुत्रा यांनी चित्रित केलेली छायाचित्रे देखील त्या समुहात एकापाठोपाठ एक  धडकू लागली आणि मी प्रत्यक्षात तिथे उपस्थितीत असल्याचा भास करून गेली. एकेकाळचे सर्व सहकारी निदान आता कसे दिसतात हे समजत होतं, मन भेटीच्या आशेने तयार होत पण नाईलाज म्हणतात तो हाच असावा, तरीही दुधाची तहान ताकावर म्हणून मीच माझी समजूत काढली. मित्रांनो खरोखर यंदा तुम्हा सर्वांना भेटायची संधी हुकली...आता पुढच्या जानेवारीत भेटू अशी आशा करतो.

        मकर संक्रांत, एक संक्रमण, एक नवीन पर्व काळ, माझ्या बाबतीत काल तसंच झालं, प्रकाशन सोहळ्यात जरी मी प्रत्यक्षात उपस्थितीत नव्हतो तरी प्राप्त छायाचित्रे आणि त्यानंतर सहभागींनी व्यक्त केलेल्या त्यांच्या कार्यक्रमाविषयीच्या आंतरिक मनोगतातून खुप सुंदर, सकारात्मक, भावनिक गोष्टी समजल्या आणि पुन्हा अनुपस्थित राहिल्याची खंत जाणवली. तरीही आशेवर जग चालते या विचाराने थंड घेतले.

        मिळालेल्या स्त्रोतांनुसार कार्यक्रम जोरदार झाल्याचं समजलं आणि समाधान वाटलं. ते या साठी की सतिश रानडेसर, सौ.मेघना, परेश, निलेश व इतर सर्व आणि वेलवेट कविशा पब्लिकेशन यांची, गेली दोनतीन महिने सुरु असलेली धावफळ दहा तारखेला एका यशस्वी समेवर थांबली, अर्थात पुन्हा नव्याने  झेप घेण्यासाठी. या करता आयोजक आणि सर्व सहभागी कवी/कवियत्रींचे मनापासून अभिनंदन.

        काल मकर संक्रांतीच्या संध्याकाळी नीलेश याने "गीतकाव्य" (ओळ गाण्यातली भावना मनातली) या सुबक छपाई, मांडणी आणि उत्कृष्ट बांधणी असलेल्या प्रातिनिधिक संग्रहाच्या चार प्रती सोबतच सानुकूलित (customise) असे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, बँज घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली, एवढं सर्व पाहून खरोखरच आश्चर्य वाटलं ते अशा गोष्टीचं की हे अंतर्नादचे पहिलेच आयोजन नसणार, पण ते सत्य आहे, कारण अवघ्या काही महिन्यापूर्वी अंतर्नादची स्थापना झाली आणि पहिलाच उपक्रम असा यशस्वीरीत्या पार पाडणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा आयोजक आणि सर्व सहभागी कवी/कवियत्रींचे मनापासून अभिनंदन करतो आणि हो, पुढील कार्यक्रमापुर्वी मी परत धडपडणार नाही याची खात्री देतो.

~शिवाजी सांगळे १५०१२०२६


बुधवार, १४ जानेवारी, २०२६

हर्ष पर्व १४०१२०२६ yq ०९:४६:१५






















हर्ष पर्व 

मकर संक्रांति वो पर्व है
सभी भारतीयों को उसपर गर्व है
एक उत्सव अनेकों नाम
अनेकता में एकता ये शेष सर्व है

प्रकृति और परंपरा संग
हमारे देश का अनोखा आदर्श है
उमंग भरे इन त्योहारों से
हर कोई उठाता यहां नया हर्ष है


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शनिवार, १० जानेवारी, २०२६

मनोगत १००१२०२६ yq १३:३८:१२

मनोगत

नकोय गंभीर चेहरा,नको वैचारीकतेचा आव
लिही मनापासून,मनी उमटलेला सच्चा भाव

नाही जमला जरी आकृतिबंध, नियम न् छंद
तरी नक्की घे, तुझ्या शब्दात भोवतीचा ठाव

युगानुयुगे विरोधच होतोय इकडे नाविण्याला
लखलाभ त्यां करती जे मारुनी मिशीला ताव
  
घेतील जाणकार समजून एकएक शब्द तुझा
लक्ष नको त्यांकडे, करती जे उगा काव काव

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

नेमके सत्य


नेमके सत्य

धडधडणे असे तुझ्या काळजाचे कळेना 
आकर्षण आर्ततेतले की गूढतेचे कळेना 

पंचतत्वात विरघळतो देह, म्हणतात जेष्ठ
परिणाम हे वर्तणुकीचे की ग्रहांचे कळेना

आहार,निद्रा,भय,मैथुन मापदंड जगण्या 
खरे वर्चस्व नैतिकतेचे की धर्माचे कळेना

काळानुसार उमटलेले ओरखडे मनावरचे
दिलेले तुझे? की आहेत, स्वतःचे कळेना 

अनादी ओढ शिवास सृष्टी न् अतर्क्याची   
नेमके सत्य, उजेड अन् अंधाराचे कळेना 

https://marathikavita.co.in/index.php?topic=74476.new#new

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

ओढ नभाची ०६०१२०२६ yq १८:०८:०७


ओढ नभाची 

ओढ त्या नभाला, या नभाची लागली
होताच गळाभेट धरीत्री ही चिंब झाली

आतुरल्या या मृदेला,गंध मोहर सुटला
क्षणात अवघी सृष्टी, गंधाळून ती गेली

झाकोळल्या गगनी, रंग निळा सावळा
जणू भजनात सावळ्याच्या धरा दंगली

अंगोअंगी चिंब ओल्या फेसाळते भुमी
भासते अशी की,दुधात न्हाऊन आली

पांघरून घोंगडी करडी, दौडता चपला
भितीने तिच्या पाखरे अन् गुडूप झाली

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९