शनिवार, ८ एप्रिल, २०१७

दरवळ मोगर्‍याचा

दरवळ मोगर्‍याचा

सांगू कसे सखे मीे, भाव माझ्या मनाचे?
स्मरतात अजुनही, दरवळ ते मोगर्‍याचे !

क्षण सहवासाचे, पाकळ्यां सह फुललेले
पाना पानात दुमडलेले, सडे पाकळ्यांचे !

मोहवुन भारावलेले, श्वास ते गंधाळलेले
गंधाने गंधीत होता, देणे उरते मोगर्‍याचे !

हलकेच मज कानी, सांगते गुज मनातले,
ओघळता खांद्यावरूनी, फुल मोगर्‍याचे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t28091/new/#new

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

दरवळ

३७३ दरवळ
सांगू कसे सखे,
भाव माझ्या मनाचे?
स्मरतात अजुनही
दरवळ ते मोगर्‍याचे !
© शिव 🎭

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

निर्झर मंद श्वासांना

निर्झर मंद श्वासांना

रेघोट्या धुळी वरल्या, बरचं सांगुन जातात,
कणां कणां सोबत, स्मृतीही गंधीत होतात !

उरले भाग्य इतके, हरित कोवळ्या पानांला,
गुढखेळ सावल्यांचा, सरावला तो मातीला !

गंध विझल्या वातींचा, दरवळतो हा अासमंती,
विरघळल्या मनाच्या, घेवुन श्वासांना सांगाती !

स्मरेल कहानी अधुरी, त्या निर्झर मंद श्वासांना,
चढतील रंगही गगनी, लुकलुकत्या तारकांना !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t28034/msg67685/#msg67685

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

बार


बार

कोल्ड ड्रिंक, ड्राय चणा
या कुछ और मंगवाकर
हमेशा की तरहा
बैठना चाहिए,
कभी तो ऐसे ही
बार में जाना चाहिए !

कान, आँखे खुली रखकर
मदं अंधेरे शोरगुल में
अपनी आवाज
सुननी चाहिए,
कभी पराया होकर
बार में जाना चाहिए !

क्या पातें है, क्या खोते है
कईयों कें बिखरे गमोंको,
समेटती खुशीयों को
अपना मानकर
सोचना चाहिए,
बिना पियें... कभी
बार में जाना चाहिए !

ज्ञान, सौदे का बाजार,
महज एैय्याशी का
मकाम होता है यहां,
उँचों से निची, और
साधारणों कि उँची
सुननी चाहिए,
उतारकर चोला अपना
बार में जाना चाहिए !

दुध नहीं मिलता
न दुध का धुला हुआ
वहां मिलता है
केवल पिया हुआ,
फिर भी नशा दोनोंको
पी कर एक को,
एक को सुनकर
इस नशे में डुबना चाहिए,
झाँक ने अपने अंदर
बार में जाना चाहिए !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/hindi-kavita/t28016/new/#new

शनिवार, २५ मार्च, २०१७

पण काहीही म्हणा... अविश्वास


पण काहीही म्हणा...
अविश्वास

विकासाच्या गप्पा करणार्‍यांना!
नियम पाळणे तसे आवडत नाही,
स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना
काटेेकोर अधिकारी चालत नाही !

डराव डराव करीत बर्‍याच वेळा
पारीत होतात सभागृहात ठराव,
सोयीचं झालं तर विश्वास दर्शक
अन्यथा आहे अविश्वासाचा ठराव!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t27883/new/#new

गुरुवार, २३ मार्च, २०१७

व्यथा

व्यथा

झुकावे लोकांनी चरणांसी !
धरावी का आस दैवत्वाची?
अाशीर्वाद पुरे शीरी शारदेचा
नको गुर्मी व्यथा कवित्वाची?

=शिव    
369/23-03-2017

रविवार, १२ मार्च, २०१७

फितूर

फितूर

जगणे का आता सुखद व्हावे
मरणाचे आता पोसता डोहाळे?

पाहिली ती सर्व दुःखद सुखे
सजविण्या नेत्रात रम्य सोहळे !

होतात ते कबूल दोन्ही येथे
फितूर मनाशी ओले ते डोळे !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t27743/new/#new

भाव रंग

।। होळी निमित्त सर्वांना रंगमय शुभेच्छा ।।
।। HAPPY HOLI 
AND 
FESTIVAl OF COLOURS ।।

शुक्रवार, १० मार्च, २०१७

जळतं आयुष्य

जळतं आयुष्य

असचं जळतं आयुष्य
परंपरेच्या वणव्यात
तापुन निघते माती अन्
रूजवते तृण पात्यास
कसे कुणास ठावूक
बळ येते तीच्यात?
करते सहन मारा...
पावसाचा,
समजुन शिडकावा
आनंदाचा,
तृप्त होते काही काळ
धुमसते लाव्ह्यागत
तरीही थंड होतांना
ठेवून जाते
आठवणींचे वळ!
न थांबणारा वणवा
घेवुन देही...
जगते काही क्षण
तरीही होत राहते
अंगाची तप्त लाही...

© शिवाजी सांगळे 🎭

गुरुवार, ९ मार्च, २०१७

मोबाईल मधुन सुटती

मोबाईल मधुन सुटती

मोेबाईल मधुन सुटती
कविता, लेख अपार,
त्वरीत ट्याग करताती
फेसबुकचे वीर हे फार...

असता तुम्ही अॅक्टीव
लिहिता देखिल भरीव
दाविता आपला स्वभाव
उचलुनी फायदे ते फार...

करूनी विनंत्या थकता
वैेतागुनीही तुम्ही जाता
काहीच फरक न होता
ते ट्यागच करती फार...

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/vidamban-kavita/t27683/new/#new