मंगळवार, १८ जुलै, २०१७

हायकू

#हायकू १११
पाऊल रानी
गवतात हिरव्या
तलम भास १८.०७.२०१७

#हायकू ११०
पाऊस गेला
पाखरे स्वैर झाली
नभी उडाली १६.०७.२०१७

#हायकू १०९
मेघ पाहती
सुर्य निघे अस्ताला
तो रक्तवर्णी १५.०७.२०१७


सोमवार, १७ जुलै, २०१७

गुढ अर्थ


!! गुढ अर्थ !!

न्यायचे सोबती, कोणा काय ठाव !
तरी धावा धाव, संचयासी !!

सुखाच्या शोधासी, करीता प्रयत्न !
होईना तो अंत, कष्टाचाही !!

वृत्ती समाधानी, ठेवोनी पहाता !
लागे सुख हाता, विचारांती !!

सांगोनी ते गेले, नश्वर ही काया !
तरी जडे माया, देहावरी !!

संताच्या वाणीत, वसे गुढ अर्थ !
जावो न तो व्यर्थ, म्हणे शिवा !!

© शिवाजी सांगळे🦋
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/!!-!!-29086/msg68887/#msg68887

शनिवार, १५ जुलै, २०१७

हायकू

#हायकू १०८
गंध दर्वळ
भ्रमरांचा घोळका
फुलली फुलं १५.०७.२०१७

#हायकू १०७
पाऊस थेंब
ओंजळीत दडले
मन रमले १४.०७.२०१७

#हायकू १०६
सांज हि आली
झाकोळलेे आभाळ
नीरवं शांत १२.०७.२०१७


शुक्रवार, १४ जुलै, २०१७

ओळख

ओळख

तुला मी आवडतो
मला सुद्धा तु आवडतेस,
समोर आल्यावर, का
ओळख द्यायची टाळतेस?
=शिव
410/12-07-2017

नको करू (अष्टक्षरी)

नको करू (अष्टक्षरी)

काजळ रेषा काढता
नेत्र बाण तो सुटतो

माळू नको तू गजरा
मीच मोहरून जातो

नको ते केस मोकळे
जीवाचा या गुंता होतो

ओष्ठशलाका लावते?
रक्तीमा गालास येतो

ओठा स्पर्ष अधराचा
कलेजा खलास होतो
© शिवाजी साांगळे 🦋
http://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t29015/new/#new

बुधवार, १२ जुलै, २०१७

या रे या...

या रे या...

फिरतात लोक आमचे
या रे, अतिरेक्यांनो या,
जीव घेण्या त्यांचा येथे
बेदिक्कत तुम्ही इथे या!

आम्ही केवळ निषेध न्
चर्चा करतो, तोवर या,
जावोत लोक पर्यटना वा
देव दर्शना, तेथे तूम्ही या!

लाज लज्जा सोडली ती
पुळका घेणारे आहेत, या,
पोसला कसाब तो आम्ही
पोसू तुम्हा, त्या साठी या!

झोपलोत कि सोंग करतो
नाही कळत, पाहण्या या,
स्वस्त आहेत जीव येथले
गोळीबाराच्या सरावास या!

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t29009/new/#new

हायकू

#हायकू १०५
ॠतुचा खेळ
उन पाऊस मेळ
रंग धनुष्य १२.०७.२०१७

#हायकू १०४
दवं थांबते
पानां फुलां वरती
क्षणिक नाते ११.०७.२०१७

#हायकू १०३
हत्तीचे दात
वेगळे छोटे मोठे
प्रतिक छान १०.०७.२०१७

रविवार, ९ जुलै, २०१७

भुलावे

भुलावे

सारेच का ते भुलावे खरे होते
ईशारे नजरेतील का खरे होते

फुलाशी थांबणे दवाचे निवांत
दाखविण्या प्रेम एवढे पुरे होते

घरगंळला न थांबला कळी संगे
एवढेच आयुष्य दवाचे खरे होते

वर्णावे किती ते गोडवे पात्यांचे
चुंबाया धरणीस बहाणे बरे होते

दशा सर्वात ती झाडाची वेगळी
पानांतुन अश्रु ढाळीत सारे होते

वाजविणे शिळ चौफेर मोकळी
एकटेच तरबेज येथले वारे होते

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t28996/new/#new

हायकू

#हायकू १०२
हात जोडोनी
होतो नतमस्तक
गुरू चरणी ०९.०७.२०१७

#हायकू १०१
कातर वेळ
अंधार खेळ सावल्या
मना डसल्या ०८.०७.२०१७

#हायकू १००
पान हलते
तोडू नको रे झाडे
हे विनवते ०८.०७.२०१७
=शिव

शनिवार, ८ जुलै, २०१७

हायकू

#हायकू ९९
पहाट पक्षी
शोधण्या चारा पाणी
घेई भरारी ०८.०७.२०१७

#हायकू ९८
सुर्यपुत्रास
तरता जळी प्रश्न
कोण जननी ०७.०७.२०१७


#हायकू ९७
विसरली ती
मुळाची सारी नाती
पान गळती ०६.०७.२०१७