हाताची घडी
अपयशाच्या डोंगरात...अपेक्षांची होडी
चाचपडणाऱ्या जगण्याची वेगळी गोडी
अंधूक प्रकाश कधी लख्ख काळोखात
चढ उतार नित्याचा त्यास सोवळी शिडी
लक्षवेधी अशी, सारीच का येथली चित्रे
नेहमीच लावतात, आभासी लाडीगोडी
सगळ्यांनाच एक सुखदुःखाचा किनारा
ऐपतीप्रमाणे घेतो, प्रत्येकजण येथे उडी
सारेच का ठरलेले? नियतीचे सर्व फासे
म्हणून का जगावे घालून हाताची घडी?
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९