गुरुवार, ५ जून, २०२५

गुण तुझे गाण्यासाठी

गुण तुझे गाण्यासाठी

सृष्टी सारी आनंदाने न्हाऊन जावू दे रे
गुण तुझे गाण्यासाठी मनी भाव येवू दे रे ॥ध्रु॥

शित वारे सुटते आधी मेघ सावळे येता
प्रफुल्लित होती झाडे जाणीव तुझी होता
नयनरम्य दृश्य अवघे मला दिसू दे रे ॥१॥

डोईवर पडती आधी थेंब अमृताचे  
अनोखा सुर बोलती बोल त्या सरींचे
आस्वाद त्या सुरांचा मला घेऊ दे रे ॥२॥

मध्ये मध्ये स्तब्ध होता सुरेल गाणे
सुखावून देते ओल्या उन्हाचे अवचित येणे
खेळ उन पावसाचा मला पाहू दे रे ॥३॥

एका एका थेंबाने नदी बहरताना
ओहळ नाल्यां मधूनी आधी दौडताना
लुटू पुटूची शर्यत एकदा मला पाहू दे रे ॥४॥

https://marathikavita.co.in/index.php?topic=57414.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २ जून, २०२५

पानगळ ०२०६२०२५ yq ११:४३:५३

पानगळ

पानगळी सारखं
मन मोकळं झालं तर?
कदाचित दु:ख वाटेल 
काही काळ!
पण एक लक्षात येतं?
ते म्हणजे,
मन पुन्हा कोरं होईल!
नव्याने नाती बांधायला...
हळूवारपणे फुलायला,
जशी पालवी फुटते नव्याने,
काय वाटतं?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, ३० मे, २०२५

ध्येय

ध्येय

तु एक मीही एक दोघं प्रवासी एका वाटेचे
माहीत नाही कुणाला गंतव्य कुठे कोणाचे

वाट सारी चाळलेली, तरी थोडी मळलेली
असून समांतर,तरी अंतर राहील कायमचे

लागलीच का थांबतो प्रवास खेळ इथला? 
हुशारीने दरवेळी आपले पाऊल टाकायचे

स्पर्धेच्या युगात नित्य रे अडथळे नियमांचे
पाळून अटी,शर्ती सर्व नेमके उत्तर द्यायचे

डाव प्रतीडाव खेळू दे, भले कुणी कितीही
तत्त्व प्रामाणिकतेचे, स्वतः नाही सोडायचे

म्हणो कुणी आहे कठीण वाटचाल इथली
लढून हिमतीने, तु ध्येय मनातले गाठायचे

https://marathikavita.co.in/index.php?topic=57119.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

बुधवार, २८ मे, २०२५

गावात बोंब झाली

गावात बोंब झाली

एकदा तिची नि माझी ठरवून भेट झाली
झाली उगा चर्चा,अन् गावात बोंब झाली || ध्रु ||

हाटेलाच्या भजींचा वाऱ्यावर गंध सुटला
पोटात भूकेचा, तेव्हा आगडोंब उठलेला
आमंत्रण देण्याची, संधी मला मिळाली || १ ||

बोलणे फार नाही इशाऱ्यात सर्व झाले
नास्ता करून पुरता बिलही देवून झाले
नको कुणी ओळखीचे पाहिले भोवताली || २ ||

सायकलवर चुकून तीचे दप्तर ठेवलेले
शेजारच्या कुणीतरी आम्हाला पाहिलेले
गावगप्पा करायची संधी त्याने न सोडली || ३ || 

https://marathikavita.co.in/index.php?topic=57008.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २६ मे, २०२५

अमृत २६०५२०२५ yq २१:०३:०५

अमृत

घेता दोन घोट जरासे, मेंदूला तजेला देतो
गंधाळून वाफाळल्या धमाल चर्चा घडवतो

थाटामाटात असतो कधी कुठे गुदमरलेला
खरा तर तो, कोपऱ्यावरील टपरीत भेटतो

काळ, वेळ, बंधनं ना त्या कशाचे लागलेले
रोजचा आहे तरी चारचौघात मजा आणतो 

उन्हाळा, पावसाळा वा ऋतू हिवाळा असो
तल्लफ भागवायला हा मात्र तत्पर असतो

ताण तणाव काहीही असो शिण घालवाया
आम्ही चहास या पृथ्वीवरले अमृत म्हणतो

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

पाऊस फील

पाऊस फील

कोसळला पाऊस येवढा तरी तो फील आला नाही
गढूळ पाण्यात नळाच्या, अजून गारवा मुरला नाही

वेडावतो माणूस जेव्हा, ऋतू त्याची नक्कल करतो
सावरुन जरी घेतो ऋतू, तरी माणूस बदलला नाही

वाहतील नदी नाले, येईलही पूर अताशा कुठे कुठे
तुंबणाऱ्या शहरांना सुद्धा अद्याप तो कळला नाही

कोडकौतुक खरे त्याचे, नित्य शेतात राबणाऱ्यांना
म्हणून मनाजोगा त्यांच्या पाऊस तो बरसला नाही 

बदलू लागलेत आडाखे, सारेच हल्ली असे येथले
कुठे,कधी,किती पडावे?अंदाज हा पावसाला नाही

https://marathikavita.co.in/index.php?topic=56923.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, २५ मे, २०२५

नाकाम प्रयास

नाकाम प्रयास

प्रित कि लत लगे ना मुझको खुब किया मैंने प्रयास
सोचा जो वह कभी ना हुआ आया जीवनमें वो खास...धृ

बात फिर ऐसी बदली
जवानी की छायीं बदली
विचारों ने करवट ली
समेट गए आपस में, आयें इतने पास
प्रित कि लत लगे ना मुझको...१

अब आलम कुछ ऐसा
वह ना रहें उनके, और
मै ना रहा अपना
सोते जगते एक सपना, अजीब सा एहसास
प्रित कि लत लगे ना मुझको...२


अलग राग उसका था
साथ देने सूर मेरा था
फिर हुआ, जो होना था
गीत अनोखा जन्मा लेकर दोनों कि सांस
प्रित कि लत लगे ना मुझको...३

https://marathikavita.co.in/index.php?topic=56881.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शनिवार, २४ मे, २०२५

व्यथा आजची

व्यथा आजची

काय काय सांगू? किती रे सांगू?
वाटते उगाच घेतली आज
मोठीच गडबड झाली आज !

कशाला नादी लागलो मी
फुकट मित्रांसोबत गेलो मी
त्या ब्रँडची, त्या व्हीस्कीची
पहिल्यांदा चव घेतली आज
मोठीच गडबड झाली आज !

तसा बुजरा, झालो धीट
पित राहिलो निट वर निट
शिकलो सवरलो असून मी
तरीही बेकार हिंडतोय आज
मोठीच गडबड झाली आज !

मुद्दाम बोलतो पिऊन मी
व्यथा आजची मांडतोय मी
नोकरी वाचून कसे जगावे
आहे का कुणाकडे काही इलाज
मोठीच गडबड झाली आज !

https://marathikavita.co.in/index.php?topic=56878.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २३ मे, २०२५

मोबाईलच्या नेटवर्कला २३०५२०२५ yq १२:४७:०७

मोबाईलच्या नेटवर्कला

मोबाईलच्या नेटवर्कला आसुसला पोर
वायफाय द्या हो जरा, करा उपकार

योग्य वेळी बिघडलो, शौकत रमलो
हाती नाही कामधंदा, झालो बेकार

नको आता मोबाईल, नको वायफाय
वेळखाऊ खेळ सारा, उपयोगाचा नाय

स्मार्टफोनचा हल्ली होतो अतीवापर 
बंधने लावा काही, ऐका हो सरकार

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, २२ मे, २०२५

खोज २२०५२०२५ yq १५:३६:०८

खोज

कौन सा सुख है दुख में ये कौन जाने
बात सच्ची, दुख ही कहता है, गर माने

रहते है बहोत सारे सुख के बंधू,बांधव
दुख का मित्र वही है,जो दुख पहचाने

शाश्वत सत्य दुख सारे इस जीवन का
आता जाता जन्म मृत्यु संग सच माने

कैसे समझाएं किसे दुख की परिभाषा
कुद पडो खोजमें खुदके तो सुख जाने

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९