मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

पाश

पाश

करण्या चोरी ती मनाची
होतो कोण मोकळा येथे?
गुंतलेला हर एक येथला
वेगळे प्रत्येकाचे पाश येथे!

आरशावरती रोखतो डोळे
रागावण्या नाही कुणी येथे,
सांधण्या विरल्या नात्यांना
नित्य नवे धागे शोधतो येथे!

जगताना स्वार्थात उजेडी
चिंता इतरांची कुणा येथे?
मुकाट जगणे फुकट सारे
हसतांना कोण मरतो येथे?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t26964/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा