बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

झाले पुरेसे

झाले पुरेसे

इथेच मरायचे प्रत्येकाला त्याच वाटेने जायचे
कळतंय सर्व जगताना तरीही हेवेदावे कशाचे

कोण मी नी कोण तु, घडीभराचे की रे सोबती
नेणार का सोबत काही, का उगा वेड संचयाचे

फायद्या विन जीवन सरते करण्यात माझे तुझे
होते रस्सीखेच हयातभर पाळून भूत संशयाचे

झाले का भले आजवर धरून वैरभाव कुणाचे
कसा विसरतो माणूस दाखले सारे इतिहासाचे

जगलो इथवर एवढेच होते रे क्षण होते बाकी
भोगले काय कसे, सारेच कसे काय सांगायचे

झाले पुरेसे प्राक्तनाने जे दिले आनंदी होताना
खुणावता वाट सुगंधी, शिव' न् काय मागायचे

https://marathikavita.co.in/index.php?topic=45293.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा