रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५
रात और मै
सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५
सिग्नल २५०८२०२५ १२:२५:०७
बुधवार, २० ऑगस्ट, २०२५
स्वप्नरंजन २००८२०२५ yq १५:५२:४५
डोळ्यात दाटे तुझे स्वप्न आता
तुच दिसतेस रात्रंदिनी येताजाता
जादुगरी कसली ही जीवघेणी
सुचेना कामधंदा, तुझी याद येता
वेडेपणा केवढा माझ्या मनाचा
गडबडतो वास्तवात समोर तू येता
धीट,अल्लड काय म्हणावे तूला
बोलतेस छान जराही न डगमगता
हवासा खेळ हा सारा वाटे बरा
स्वप्नरंजन केवढे मनाचे पहा आता
भास, आभास मात्र हे सगळे
दाटती डोळ्यात तूच स्वप्नात येता
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५
पाऊस असा झणीं आला
शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५
असेही स्वातंत्र्य (ट्राफिक ज्याम)
असेही स्वातंत्र्य (ट्राफिक ज्याम)
काही कारणास्तव कधी सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील प्रवास करावा लागतो, मान्य प्रत्येकाला काही तरी काम असावे, पण रस्त्यावर आपण आपली गाडी घेऊन आल्यावर काही नियम, शिस्त पाळावी लागते. एकेरी वाहतूक सुरू असताना आपण सुद्धा निमूटपणे एक रांगेत राहून समोरील व अन्य वाहनांना अडचण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी, पण आमच्या कडून तेच होत नाही.
पटकन पुढे जायच्या हेतूने प्रत्येक आगावू वाहन धारक घाई करतो, त्यातच कहर म्हणजे अँडव्हेंचर स्पोर्ट बायकर्स, जाडजूड टायरच्या बाईक घेऊन, भयानक आवाज करीत फिरायला निघतात, मधे मधे अन्य दुचाकीस्वार भलीमोठी कसरत करीत, गँप शोधून पुढे पुढे जायचा प्रयत्न करतात, प्रसंगी धडपडतात, वाहन छोटे, मोठे कोणतेही असो, घाट रस्त्यावर मात्र भल्याभल्यांची भंबेरी उडते, कधी गाडी गरम होऊन पुढे जात नाही, चढणीला मागे सरकण्याची भिती वगैरे सतत मनात राहते. बाईक स्लीप होणे तर नित्याचे.
अरे, निघा ना फिरायला, आपली कामं करायला पण रस्त्यावर थोडा तरी civic sense वापरा. मलाच पुढे, अगोदर जायचे म्हणून दूसरी, तिसरी रांग करून संपूर्ण रस्ता आडवायचा, समोरच्या वाहनाला न सरकायला, न यायला जायला वाट, परंतु रहदारीची मात्र पुरती वाट लागते. त्यासोबत अप्रत्यक्षपणे वेळ, पैसा आणि इंधनाची हानी होत राहते, वर होणारा मनस्ताप वेगळाच.
आपण नेहमी, प्रशासन, पोलीस यंत्रणांना दोषी ठरवतो, पण स्वतः काय करतो ते परस्पर विसरून जातो. मला वाटतं आपण ५०% जरी शिस्त, संयम पाळला तर बराच मोठा फायदा, सुविधा सर्वांना मिळू शकते.
पहा एकदा विचार करून...
~शिवाजी सांगळे
बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५
वादग्रस्त प्रश्न
मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५
शाश्वत
शोध घेता शाश्वताचा दु:खच गवसले मला
सुख हवे पुन्हा,भोगणारे म्हणू लागले मला
तक्रार गोठल्या बर्फास, टोचणाऱ्या सुईची
स्पर्शाने मात्र, गारठ्याचे काटे टोचले मला
कशाला हवी आणखी परीक्षा नवी विषारी
परंपरांनी जुन्या,पुन्हा खिंडीत गाठले मला
सावकाश जा तू इथून, आधीच म्हटले होते
कर्तव्यदक्ष टोळीने,होते चौकात घेरले मला
ठरविले होते टाळूया दु:खांना वारंवार जरी
सुख आगळे, भेटीत त्यांच्याच लाभले मला
नको असतो कुणासही साधा मित्र अताशा
उगाच का सोबत्यांनी अर्ध्यात सोडले मला
https://marathikavita.co.in/index.php?topic=62363.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५
हसायला येतं ०८०८२०२५ yq १३:४१:१३
शनिवार, २ ऑगस्ट, २०२५
साक्ष
बस एवढीच काय ती माझी कमाई आखरी
दिले घेतले जे काही त्यास साक्ष हि स्वाक्षरी
विखुरलेत ठसे अस्पष्ट काही आसमंती येथे
तरी आहेत ठोस काही कोरलेले मना अंतरी
सोडून कितीक द्यावे, बोलणे कुणा कुणाचे
लागतोच ना शब्द एखादा शेलका जिव्हारी
जातो जिथे तीथे, वाटते असतो मी, एकटा
एखादी तरी असतेच, अज्ञात चिंता शेजारी
सावल्या आठवणींच्या येता दारी मनाच्या
गुंतवून स्वतःत त्या, करतात वसूल उधारी
https://marathikavita.co.in/index.php?topic=61550.new#new
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९