मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

शाश्वत

शाश्वत

शोध घेता शाश्वताचा दु:खच गवसले मला
सुख हवे पुन्हा,भोगणारे म्हणू लागले मला

तक्रार गोठल्या बर्फास, टोचणाऱ्या सुईची
स्पर्शाने मात्र, गारठ्याचे काटे टोचले मला

कशाला हवी आणखी परीक्षा नवी विषारी
परंपरांनी जुन्या,पुन्हा खिंडीत गाठले मला

सावकाश जा तू इथून, आधीच म्हटले होते
कर्तव्यदक्ष टोळीने,होते चौकात घेरले मला

ठरविले होते टाळूया दु:खांना वारंवार जरी
सुख आगळे, भेटीत त्यांच्याच लाभले मला

नको असतो कुणासही साधा मित्र अताशा  
उगाच का सोबत्यांनी अर्ध्यात सोडले मला

https://marathikavita.co.in/index.php?topic=62363.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा