बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

स्वप्नरंजन २००८२०२५ yq १५:५२:४५


स्वप्नरंजन

डोळ्यात दाटे तुझे स्वप्न आता 
तुच दिसतेस रात्रंदिनी येताजाता 

जादुगरी कसली ही जीवघेणी
सुचेना कामधंदा, तुझी याद येता 

वेडेपणा केवढा माझ्या मनाचा
गडबडतो वास्तवात समोर तू येता 

धीट,अल्लड काय म्हणावे तूला
बोलतेस छान जराही न डगमगता 

हवासा खेळ हा सारा वाटे बरा
स्वप्नरंजन केवढे मनाचे पहा आता 

भास, आभास मात्र हे सगळे
दाटती डोळ्यात तूच स्वप्नात येता 

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा