बुधवार, २५ एप्रिल, २०१८
रंग
याचक
याचक
याचक: खुप भूक लागा है, कुछ देव ना खानेको...
वाटसरू: चायपाव, वडापाव काय देऊ?
याचक: कुच बी चलेगा...
(वाटसरू हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर देतो)
हॉटेल मँनेजर: क्या सुनताय उसकी? वो ऐसाहीच करता है, नहीं खाएगा वो..!
वाटसरू: नाही हो, पैसे देण्या पेक्षा बरं ना? खायला मागतोय तो!
हॉटेल मँनेजर: आपकी मर्जी... ग्यारा रूपया दो... "ऐ... एक चायपाव पार्सल... लाना.
वाटसरू चहा पाव घेऊन
याचकाकडे जातो, प्रेमाने त्याच्या हातात चहापाव
देत...
...घे खाऊन, बाबा.
याचक चहापाव हाती घेतो, वाटसरू कडे भेदक नजरेने पहात...
पागल है दुनिया... पागल...हा
हा...
हॉटेल कडे पहात पावाचे तुकडे
करतो,
तोंडाने अतर्क्य बडबड करीत
असताना चहासकट पावाचे तुकडे इतस्ततः भिरकावून देतो...
©शिव 11-04-2018
शोध
डोह
साद
भेट
समाधी
शृंगार पापणीचा
शुक्रवार, २० एप्रिल, २०१८
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)