मंगळवार, ११ जून, २०१९
सोमवार, १० जून, २०१९
प्राक्तन🍁
वक़्त की कश्ती
शुक्रवार, ७ जून, २०१९
मागोवा
मागोवा
स्मरती विस्मरती अनेक बुजल्या वाटा
खुणा भेटीच्या साऱ्या पुसटल्या जाता
काळवेळ सरता उरतो शब्द भास मागे
अक्षरे जुळता लिहिली जाते प्रेम गाथा
ठरवूनी विसरावे सारे असे जमत नाही
भेट फक्त ऋणानुबंधी स्मरणात आता
वेड वाऱ्याचे अन् नाते गंधाचे फुलांशी
उमगे सत्य पाखरांसवे हितगुज करता
व्याप कशास ठेवू उगाच ताप कशाला
जगावं बिनघोर नी मुक्त एकांती जाता
वाकुल्या दावी दूर कड्यावर धूसर रांगा
मस्त विहरती घेत मागोवा जळात लाटा
© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31789/new/#new
स्मरती विस्मरती अनेक बुजल्या वाटा
खुणा भेटीच्या साऱ्या पुसटल्या जाता
काळवेळ सरता उरतो शब्द भास मागे
अक्षरे जुळता लिहिली जाते प्रेम गाथा
ठरवूनी विसरावे सारे असे जमत नाही
भेट फक्त ऋणानुबंधी स्मरणात आता
वेड वाऱ्याचे अन् नाते गंधाचे फुलांशी
उमगे सत्य पाखरांसवे हितगुज करता
व्याप कशास ठेवू उगाच ताप कशाला
जगावं बिनघोर नी मुक्त एकांती जाता
वाकुल्या दावी दूर कड्यावर धूसर रांगा
मस्त विहरती घेत मागोवा जळात लाटा
© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t31789/new/#new
गुरुवार, ६ जून, २०१९
वेड चहाचे
सकाळी सकाळी हातात चहाचा कप असता, माझा चहा व्यावसायिक शाळा सोबती अविनाश याचा वॉट्स अँटवर मेसेज आला, अर्थात काय असेल मेसेज? आधी तो पाहू की चहा घेवू? अशा द्वंद्वात फसलेला असतांना स्व. वंदना विटणकरांचं "हा छंद जीवाला लावी पिसें" हे गाणं आठवलं. नेमकं आमच्या सोबत्याचं आडनाव सुद्धा पिसे... हातात चहा, मोबाईलवर त्याचा मेसेज... मग काय सर्व राहिलं बाजूला आणि #वेड_चहाचे या विडंबन गीताची निर्मिती झाली... अर्थात वंदना ताईंची क्षमा मागून...
बुधवार, ५ जून, २०१९
प्रकृति की पुकार
मंगळवार, ४ जून, २०१९
कभीकभी मन
सोमवार, ३ जून, २०१९
पहिला पाऊस
कहानी आजकी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)