शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

शेतकरी १३१२२०१४ yq १७:२५:४५

शेतकरी

स्वप्नात जगणाऱ्यांना
कष्टाची किंमत काय कळणार
पिझ्झा, बर्गर पिढीला
कष्टाळू शेतकरी कसा समजणार

रस्त्यावर यांची घासाघीस
मॉलमध्ये मुकाट एमआरपी देणार
शिकवायला मोल मातीचं
कोणतं बायोटेक कॉलेज पुढे येणार

वात्रटिका, 13-12-2024 YQ 05:25:45 PM

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

सैरभैर वारा

सैरभैर वारा

वाहतोय सैरभैर मी वारा झालोय...
ओलांडून दऱ्याखोऱ्या मी भेटण्या आलोय

घेऊ म्हणतो विश्रांती क्षणभर येथे...
खबरबात प्रवासाची साऱ्या देण्या आलोय

किती ते गंध, रंग फुला माणसांचे...
ओळखू कसे खरे खोटे विचारण्या आलोय

कसे हे देणे प्राक्तनाचे मज भाळी...
चालेल कुठवर प्रवास हा जाणण्या आलोय

सगळेच कसे अनिर्बंध घडते येथे...
सैल का नियंत्रण?नियंत्या पाहण्या आलोय

https://marathikavita.co.in/index.php?topic=48488.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

आजकल २७११२०२४ yq १०:०१:१५

आजकल 

गलत को गलत कहो
फिर चाहें जो कुछभी होना हो

अच्छा, सच्चा जो होगा
उनकी तरफदारी मे सदा रहों!

बोलबाला झूठ,फरेब का 
आज वैसेभी मुफ्त में होता है

न्याय मिलने तक "सच्चा"
प्रतीक्षा मे अकेले ही रोता है!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

मुक्त कविता २५११२०२४ yq १२:५५:१७

मुक्त कविता

मुक्त छंद कविता
मन में दबी भावूकता
पता नहीं उसे, 
कब है उसे बहना...

निकलती है, 
अनगिनत सवाल लेकर
और थम जाती है
उस मोड पर उदासी के...
अछूते किनारे पर

देखती है, दर्पण में...
अपने आप को
खुद जो मग्न है
धूंधलाहट मे...

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

अपराध? २२११२०२४ yq १५:२२:१०

अपराध?
अपराध काय माझा
सावली तर देत होतो
पाखरांच्या आडोशाला
थोडासा आधार होतो

काय मागितले कुणास
मी माझ्या जगण्यासाठी
सारेच उपभोगले तुम्ही
जन्मले जे माझ्या पोटी

केला जरी कुणी डाव
मला नष्ट करण्याचा
वृत्ती परोपकार अशी
सुटेना ना हट्ट सेवेचा

पुन्हा पुन्हा जन्मेन मी
वसा निष्पाप धरित्रीचा
काही घ्या तिच्याकडून
घ्या वेध येत्या पिढीचा
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४

खरे रूप १९११२०२४ yq ११:४२:२५

खरे रूप

निवडणूक सोहळा, होईल संपन्न
विसरू नका कोणी, करा रे मतदान,
राहून जागरूक, कर्तव्य करा रे
द्यावा निवडणूक, प्रतिनिधी सुजाण !

पुढील पाच वर्षे चालवे जो गाडा
अन्यथा ठरलेला, आहे नशिबी राडा,
पुढाऱ्यांचे काय? त्यांचा तर धंदा
जनतेस ना काही, त्यां तर भाव चढा !

वायदे, अश्वासने, ऐकलीत खूप
निकाला नंतर, घालेल का कुणी धूप?
म्हणून व्हा,आपण वेळीच सावध
मत द्या जाणून, उमेदवाराचे खरे रूप !

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

गोष्ट अस्तित्वाची

गोष्ट अस्तित्वाची

सापडेना मज, स्वतःतला तु देवा हल्ली
देवळा देवळात शोधतो तुज देवा हल्ली

चेंगरून गर्दीत आणि लावीत रांगा मठी
असतो उभा फक्त,प्रदर्शनीत देवा हल्ली

कुठवर पहावी, वाट मी तुझ्या दर्शनाची
दिसशिल का रे, तु ओझरता देवा हल्ली

भक्ती किती, देखावा किती, काय सांगू?
जाणतोस तुच खरे मनातले देवा हल्ली

गोष्ट खरी सांगतो हळूच, ऐक तु एकदा
भक्तांमुळे इथे अस्तित्व तुझे देवा हल्ली

https://marathikavita.co.in/index.php?topic=47182.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

कोणी तरी हवं १३११२०२४ yq १९:३७:०५

कोणी तरी हवं 

कोणी तरी हवं असतं...प्रत्येकाला
कधी गुजगोष्टी तर कधी भांडायला 

ठरवतो तुम्ही आम्ही खुप बोलायचं
तेव्हा सुद्धा असावं कुणी ऐकायला 

एकूण काय,माणूस आहोत आपण
म्हणून लागतंच कुणीतरी सोबतीला

साराच खेळ इथे हा भाव भावनांचा
अपेक्षा छोटी हवी समजून घ्यायला

एवढं सारं लिहितो सगळेच आपण  
नको का..मग कोणी तरी वाचायला

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

सब ठीक है

सब ठीक है

चिंता की कोई बात नहीं, सब ठीक है
ज़िन्दगी गुजर रही हैं बस् सब ठीक है

तरक्की की होड में, मगन है चंद लोग
बढती हैं मात्र बेरोजगारी, सब ठीक है

राजनीति चरम पर आजकल, देशभर
जिंदा हैं आम महंगाई मे, सब ठीक है

मश्गूल हरकोई अपने ही कुनबे में यहां
बट रहा है सिर्फ देश, और सब ठीक है

कौन देगा शिक्षा? कौन पढेगा किससे?
ग्यान दाता सोशल मीडिया,सब ठीक है

https://marathikavita.co.in/index.php?topic=47021.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

एम्.पी.एल्.



एम्.पी.एल्.

वा, महाराष्ट्र पोलिटिकल लीगची
मतदारां करता, बोली सुरु झाली आहे,

पंधराशे, एकविसशे, तीन हजार,
इत्यादी खैरातींचं अमिष दाखवलं आहे!

हा तर, पुढील पाच वर्षांंचा करार
कोण कुणाला स्वतः कडे ओढणार आहेत?

विचार करून, निर्णय घ्या मंडळी
सर्व संघ मालक टोपी लावण्यात ग्रेट आहेत!

https://marathikavita.co.in/index.php?topic=46928.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९