सोमवार, १० मार्च, २०२५

आतला आवाज १००३२०२५ ya १८:५२:५५


















आतला आवाज

आतला आवाज...तर कळायला हवा
बंदिस्त भावनानां वाव मिळायला हवा

कुठवर ठेवायचे कोंडून, विचार आता
झुंडीने एकत्रित आवाज करायला हवा

एकजुटीच्या अस्तित्वाने बदलते दशा
खंबीरपणे एक आवाज उठायला हवा

गारद झाल्या कैक सत्ता,इतिहास येथे
चमत्कार एकीचा, तो दाखवायला हवा

त्रयस्थ होऊन, कधी तरी दूरस्थ राहून
मना,स्वतःचाच आवाज ऐकायला हवा

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९ 

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

नव्याने

नव्याने
प्रत्येक जण म्हणतो आयुष्यावर बोलू काही 
भले बुरे आले वाट्याला इतरांना सागू काही 

सुखदु:खांचे कैक तरंग उठती जगताना येथे 
कठीण हलके पापुद्रे त्यातील उलगडू काही 

भेद किती, न् काय दडले आहे जीवनात या 
चल् दोस्ता, आपण दोघं मिळून शोधू काही 

रचतो जरी जो कुणी डाव अतर्क्य गूढ इथले 
उत्तर म्हणून दोघं त्यातील हाणून पाडू काही 

भ्रष्ट केली यांनी गज़ल इथली म्हणोत कोणी 
वेगळेपण नव्याने आपले त्यांना रे दावू काही 
https://marathikavita.co.in/index.php?topic=52737.new#new

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९